लॉकडाउननंतर भारताच्या विविध राज्यांमध्ये शांततेचं चित्र
संपूर्ण भारतात शुकशुकाटाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता २४ मार्चपासून २१ दिवसांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात शुकशुकाटाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. कोणालाही घरातून बाहेर पडण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. या आणीबाणीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर भारताच्या वेग-वेगळ्या भागातले फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.