PHOTO: AC चे स्फोट का होऊ लागलेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका; गारेगार हवेच्या नादात आयुष्यभराचं गमावून बसाल

सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. 

Jun 07, 2024, 16:00 PM IST

Air Conditioner Safety Tips: सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. 

 

1/8

सध्या प्रचंड उकाडा असल्याने एसीचा प्रचंड वापर केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणांहून एसीचा स्फोट झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.   

2/8

नुकतंच गाझियाबादमधील एका सोसायटीत एसीचा स्फोट झाल्याने आग लागली. गेल्या एका महिन्यात अशी 2 प्रकरणं समोर आली आहेत.   

3/8

हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण अशामध्ये अनेकांच्या मनात एसीमध्ये स्फोट होण्याची नेमकी कारणं काय असतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.   

4/8

कंप्रेसरमध्ये लीक

कंप्रेसरमध्ये लीक

एसीचा स्फोट होण्याची अनेक कारणं असून यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे कंप्रेसमरमध्ये लीक होणं. यामुळे स्फोटाची शक्यता फार बळावते.  

5/8

कमी तापमानावर वापर

कमी तापमानावर वापर

जर तुम्ही एसी फार कमी तापमानावर वापरत असाल तर एसीला फार मेहनत घ्यावी लागते. यामुळेही दुर्घटना होऊ शकते.   

6/8

फिल्टर स्वच्छ न करणं

फिल्टर स्वच्छ न करणं

जर तुम्ही एसीची फार काळ सर्व्हिसिंग केली नसेल आणि अस्वच्छ फिल्टरसह वापरत असाल तर तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं.   

7/8

जर तुम्हाला दुर्घटना टाळायची असेल तर वेळोवेळी एसीचं सर्व्हिसिंग करत राहा.   

8/8

याशिवाय एसीचा वापर करताना ओव्हर कुलिंग टाळायला हवं. तसंच मोठ्या खोलीसाठी छोटा एसी वापरणंही धोकादायक असतं.