Ajit Agarkar टीम इंडियाचे नवे चीफ सिलेक्टर; आगरकरांना किती मिळणार पगार? जाणून घ्या एका क्लिकवर

BCCI Chief Selector: अखेर टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टर पदावर शिक्कामोर्तब झालंय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर बनलेत.

Jul 04, 2023, 22:57 PM IST
1/6

चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर 17 फेब्रुवारीपासून सिलेक्शन कमिटीचं अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर या ठिकाणी मराठमोठा माजी खेळाडू अजित आगरकर यांची वर्णी लागलीये.

2/6

सध्या निवडसमिती अध्यक्षाला वर्षाला 1 कोटी रूपये पगार मिळतो. तर इतर सदस्यांना 90 लाख रूपये मिळतात. 

3/6

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने निवड समिती अध्यक्षपदासाठी मिळणाऱ्या वार्षिक पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

4/6

त्यामुळे जर पगारात वाढ झाली तर अजित आगरकर यांना वर्षाला एक कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.

5/6

मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकर निवड समिती अध्यक्षाला मिळणाऱ्या पगाराबाबत फारसे उत्सुक नव्हते. 

6/6

Ajit Agarkar

यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अजित आगरकर यांच्याशी संपर्क साधत पगारवाढ करण्याचं आश्वासन दिल्याचं समजतंय. ( या माहितीची खातरजमा झी 24 तासने केलेली नाही. )