एक एक केस तोडल्याने आजूबाजूचे सर्व केस पांढरे होतात का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
सध्या सुरु असलेल्या धावपळीच्या जगात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं सगळ्यांनाच जमतं अशातला भाग नाही. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. जसं की, केस गळणे, केस तुटणे, फाटे फुटणे, केसांची घनता कमी होणे, टक्कल पडणे अशा अनेक समस्या तरुणांमध्ये देखील जाणवू लागल्या आहेत.
अनेक उपाय करुनही काही जणांचे केस पांढरेच दिसतात. हे पांढरे केस लपवण्यासाठी बरेच लोक केसांना विशिष्ट रंग लावतात, मेंहदी लावतात आणि तर काहीजण पांढरे केस मुळापासून उपटण्याचा प्रयत्न देखील करतात. पण तुम्हाला माहितेय का, पांढरे केस मुळापासून उपटल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते.