आधीच झाली होती भविष्यवाणी, आणि नको तेच घडलं! सूर्यवंशमची ही अभिनेत्री आठवते?

अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' चित्रपटात पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौंदर्या आठवते का? ही अभिनेत्री आज आपल्यात नसूनही ती चाहत्यांच्या हृदयात आज जिवंत आहे.

Jul 17, 2024, 18:35 PM IST
1/7

'सूर्यवंशम' चित्रपटाचा मोठा चाहता वर्ग

'सूर्यवंशम' या चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखेचं चाहते अजूनही कौतुक करत असतात. 

2/7

दमदार अभिनय

दुसरीकडे या चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्याने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली होती. चित्रपट हिट नसला तरी तो आजही प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत आहे. 

3/7

डॉक्टर होण्याचे स्वप्न

सौंदर्याने 1999 मध्ये सूर्यवंशम चित्रपटात हीरा ठाकूरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. लहानपणापासून सौंदर्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. पण नशिबाने तिला सिनेसृष्टीत आणले. 

4/7

हसतमुख सौंदर्या

वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत असतानाच सौंदर्याला वडिलांच्या एका मित्राच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हसतमुख असणाऱ्या सौंदर्याने अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. 

5/7

गंधर्वमधून सिनेसृष्टीत पदार्पण

सौंदर्याने कन्नड चित्रपट गंधर्वमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर सौंदर्याने 10 वर्षांच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये कामं केलं.

6/7

31 व्या वर्षी मृत्यू

मात्र, वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अभिनेत्रीला हे जग सोडावे लागले. चित्रपटसृष्टीनंतर तिने राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केली. पक्षाच्या रॅलीसाठी खासगी विमानाने जात असताना अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला

7/7

मृत्यूबाबत आधीच भविष्यवाणी

एका ज्योतिषाच्या माहितीनुसार, हे संकट टाळण्यासाठी सौंदर्याच्या पालकांनी अनेक विधी केले. पण कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर अभिनेत्री सौंदर्या एका अपघाताची बळी ठरली.