'या' व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा बंगला

Feb 15, 2020, 13:37 PM IST
1/5

'या' व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा बंगला

एक आलिशान आणि अद्वितीय असं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. बरेचजण त्यांच्या स्वप्नातील घराची ही प्रतिमा सत्यात उतरवण्यात यशस्वी ठरतात. सध्या अशाच आलिशान घरासाठी प्रकाशझोतात आले आहेत amazon ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस jeff bezo. 

2/5

'या' व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा बंगला

लॉस एंजेलिस येथील बेवर्ली हिल्स येथे त्यांनी तब्बल १६.५ कोटी डॉलर इतक्या किंमतीला एक भव्य बंगला खरेदी केला आहे. या भागात घर खरेदीच्या प्रकरणात बेजोस यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

3/5

'या' व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा बंगला

'वॉलस्ट्रीट जर्नल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार बेजोस यांनी हे घर व्यावसायिक डेव्हिड गेफेन यांच्याकडून खरेदी केलं आहे. लॉस एंजेलिसमध्येही या खराच्या खरेदी कराराने एक नवा विक्रम रचला आहे. सध्याच्या घडीला त्या भागातील हे सर्वाधिक महागडं घर ठरत आहे. यापूर्वी लाशन मर्डोक यांनी बेल एअर इस्टेटची खरेदी करण्यासाठी जवळपास १५ डॉलर रुपयांची किंमत मोजली होती. 

4/5

'या' व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा बंगला

हाती आलेल्या माहितीनुसार वॉर्नर इस्टेट नावाचा हा बंगला बेवर्ली हिल्स परिसरात ९ एकरांच्या परिसरात उभा आहे. यामध्ये गेस्ट हाऊस, टेनिस कोर्ट आणि गोल्फ कोर्टसह इतरही सुविधा आहेत. वॉर्नर ब्रदर्सचे माजी अध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी १९३०मध्ये हे घर उभं केलं होतं. 

5/5

'या' व्यक्तीने खरेदी केला जगातील सर्वात महागडा बंगला

१८ जुलै २०१८ला समोर आलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये बेजोस यांनी सर्व विक्रम तोडले होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १५० अरब डॉलरच्याही पलीकडे पोहोचली होती. २०१९ मध्ये बेजोस यांना मागे टाकत बिल गेट्स यांनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थान मिळवलं होतं.