अंबानी आणि तैमूरच्या नॅनीचा पगार ऐकल्यावर तुम्हाला वाटेल आपणही हेच 'काम' करावं का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं लग्न झालं असलं तरी त्याची आताही चर्चा ही सुरुच आहे. त्यातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक फोटो ज्याची चर्चा सगळीकडे रंगली होती ती म्हणजे अनंतची नॅनी ललिता डीसिल्वा यांची...  

| Jul 18, 2024, 15:50 PM IST
1/7

ललिता डीसिल्वा यांनी जेव्हा अनंत अंबानीच्या लग्नातील फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. त्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले. खरंतर त्यांचे आणि अंबानी कुटुंबाचे खास कनेक्शन आहे. 

2/7

ललिता डीसिल्वा या अनंत अंबानीच्या नॅनी होत्या. दरमहिन्याला त्यांना खूप चांगलं मानधन मिळत होते. 

3/7

ललिता डीसिल्वा या अनंत अंबानीला बाबा म्हणून हाक मारायच्या आणि नीता अंबानी यांना वहिणी आणि मुकेश अंबानी यांना सर म्हणून हाक मारायच्या. 

4/7

रिपोर्ट्सनुसार, ललिता डीसिल्वा करीना कपूरचा मुलगा तैमूरच्या नॅनी होत्या. त्यांना दरमहिन्याला 1.5 लाख रुपये मानधन मिळायचं. 

5/7

ललिता डीसिल्वा यांनी जेहच्या जन्मानंतर त्यांना नॅनी म्हणून हायर करण्यात आलं त्यावेळी देखील करीना-सैफनं त्यांना 1.5 लाख रुपये महिन्याचा पगार दिला. 

6/7

ललिता या शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचा मुलगा जैनच्या देखील नॅनी होत्या. रिपोर्ट्सनुसार, त्यांना दरमहिन्याला 80 हजार रुपये पगार मिळायचा. 

7/7

ललिता या सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची लेक क्लिन कारा कोनिडेलाची नॅनी आहेत. त्यासाठी त्यांना दरमहिन्याला मोठी रक्कम मिळते.