अयोध्येला मुघल साम्राज्याकडून 'या' हिंदू राजाने जिंकल, रचला मंदिराचा पाया

Ayodhya Ram : राम लला यांचा प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला अयोध्येत होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यासाठीही ही अभिमानाची वेळ आहे. कारण 1742 मध्ये अमेठीचे राजा गुरुदत्त सिंग यांनी रामजन्मभूमी मुघलांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला होता.

| Jan 06, 2024, 16:11 PM IST

Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येत 22 जानेवारी रोडी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या क्षणाला ऐतिहासिक क्षण बनवण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेता आणि महत्त्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत या सोहळ्याबाबत मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीसाठी देखील ही अभिमानाची वेळ आहे कारण 1742 मध्ये अमेठीचे महाराज राजा गुरुदत्त सिंह यांनी रामजन्मभूमी मुघलांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला होता. राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी अमेठीतील लोक महाराज राजा गुरुदत्त सिंह यांची आठवण काढत आहेत.

1/6

अयोध्या राम मंदिराचा इतिहास

Amethi King Gurudatt Singh

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

2/6

अयोध्या राम मंदिराचा इतिहास

Amethi King Gurudatt Singh

जवळपास दोन दिवस चाललेल्या या युद्धात महाराजा राजा गुरुदत्त सिंग यांनी नवाब सआदत अली खान यांचा पराभव करून त्यांना रामजन्मभूमी रिकामी करण्यास भाग पाडले होते. महाराजा राजा गुरुदत्त सिंह यांच्याशी झालेल्या युद्धात मुघल सैन्याचा संपूर्ण नाश झाला, त्यानंतर अयोध्येची रामजन्मभूमी मुघलांच्या तावडीतून मुक्त झाली.

3/6

अयोध्या राम मंदिराचा इतिहास

Amethi King Gurudatt Singh

 युद्ध जिंकल्यानंतर महाराजा राजा गुरुदत्त सिंह यांनी अयोध्येतील जन्मस्थानाजवळ राम जानकी मंदिर बांधले होते, जे आजही अस्तित्वात आहे. अयोध्येच्या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने लोक पूजा करतात.

4/6

अयोध्या राम मंदिराचा इतिहास

Amethi King Gurudatt Singh

आजही महाराज राजा गुरुदत्त सिंग यांचे कुटुंबीय अयोध्येत येतात तेव्हा ते राम जानकी मंदिरात नक्कीच जातात, असे म्हटले जाते. या मंदिराच्या आवारात अमेठीतील लोकांना राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

5/6

अयोध्या राम मंदिराचा इतिहास

Amethi King Gurudatt Singh

महाराज राजा गुरुदत्त सिंग यांना मुघलांच्या विरोधात ऋषी-मुनींनीही साथ दिली हे विशेष. मात्र, युद्ध जिंकल्यानंतर महाराजा राजा गुरुदत्त सिंग यांचे मुघलांशी वैर वाढले, त्यानंतर संतप्त झालेल्या नवाबांनी पुन्हा एकदा अमेठी राज्यावर हल्ला केला.

6/6

अयोध्या राम मंदिराचा इतिहास

Amethi King Gurudatt Singh

एक प्रदीर्घ लढाई चालू राहिली आणि नंतर महाराजा राजा गुरुदत्त सिंग यांना अयोध्या सोडून रामनगरला यावे लागले. जिथे त्याने राजवाडा स्थापन केला. जे आजही भूपती भवन म्हणून ओळखले जाते.