काळवंडलेले डोळे, सुखलेला चेहरा... अमिताभ बच्चन यांच्या अभिनेत्रीला नेमकं झालंय तरी काय?

आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने जिने लाखो प्रेक्षकांना घायाळ केलं. आज त्या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण. आज असं काम करतेय जे पाहून तुम्हालाही बसेल धक्का. 

| Aug 06, 2024, 20:51 PM IST

एके काळी सुपरहिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे सारेच दिवाणे होते. या अभिनेत्रीने ज्या सिनेमांना स्पर्श केला तो चित्रपट हिट झाल्याचा अनुभव आहे. ही गोष्ट आहे अमिताभ बच्चन आणि सनी देओलसोबत काम केलेल्या मीनाक्षी शेषाद्रीची. मीनाक्षीने बॉलिवूडमधील आपलं चांगलं करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पण आज तिची अशी झाली व्यवस्था. 

 

1/8

ही कथा आहे एका अभिनेत्रीची जिने अमिताभ बच्चनपासून सनी देओलपर्यंत सर्वांसोबत काम केले आहे. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीसोबत प्रत्येक दिग्दर्शकाला काम करायचं होतं.  पण नंतर असं काही घडलं की ती तिचं सुपरहिट करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. ही कथा आहे मीनाक्षी शेषाद्रीची. जी आता परदेशात राहून तिने अभिनयाला कायमचा राम राम ठोकला आहे. 

2/8

तमिळ कुटुंबातील अभिनेत्री

मीनाक्षी शेषाद्री यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1963 रोजी झारखंडमधील सिंद्री येथे झाला. तिचा जन्म तामिळ कुटुंबातून आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तिने वयाच्या 17 व्या वर्षी 'मिस इंडिया'चा किताब जिंकला होता. त्यानंतरच ती बॉलिवूडकडे वळली.

3/8

सिनेमे

मीनाक्षी शेषाद्री यांनी 1983 ते 1999 पर्यंत काम केले. 'पेंटर बाबू' हा तिचा पहिला चित्रपट होता. ज्याची निर्मिती मनोज कुमार यांनी केली होती. यानंतर ती 1983 मध्ये हिरोमध्ये दिसली. पुढे तिने घर हो तो ऐसा, दामिनी, दहलीज, महादेव, आवारगी, दिलवाला, गंगा जमुना सरस्वती ते महादेव यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये तिने अनिल कपूर, अमिताभ बच्चन, सनी देओल आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले.

4/8

आता काय करते अभिनेत्री

मीनाक्षी शेषाद्री अभिनयासोबतच नृत्यातही निष्णात आहे. तू मेरा हिरो (दामिनी) आणि प्यार करने वाले (हीरो) मधील तिच्या नृत्याचे खूप कौतुक झाले. भरतनाट्यम आणि कथ्थकसह चार नृत्य कलांमध्ये ती पारंगत आहे. आता ती अमेरिकेत राहते आणि स्वतःची डान्स स्कूल चालवते. जिथे अनेक मुलं त्याच्याकडून डान्स ट्रिक्स शिकत आहेत.

5/8

का सोडलं बॉलिवूड

मुख्य अभिनेत्री म्हणून मीनाक्षी शेषाद्रीचा शेवटचा चित्रपट घातक होता. यानंतर ती 'स्वामी विवेकानंद' आणि 'घातक वन्स अगेन'मध्ये पण पाहुणी अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. घातक सिनेमानंतर ती ना कोणत्या चित्रपटात दिसली, ना कुठल्या पार्टीत.

6/8

कुणी केलं होतं प्रपोझ

दामिनी आणि घातक सारखे चित्रपट करणाऱ्या राजकुमार संतोषी यांची ती आवडती अभिनेत्री होती. जेव्हा त्यांनी अभिनेत्रीला प्रपोज केले तेव्हा हे गुपित उघड झालं. पण अभिनेत्रीने ही ऑफर नाकारली आणि इंडस्ट्रीलाही अलविदा केला.

7/8

पती आणि मुलं

मीनाक्षी शेषाद्रीचे पती बँकर हरीश म्हैसूर आहेत. दोघांनी न्यूयॉर्कमध्ये लग्नाची नोंदणी केली. आजही त्याचे कुटुंब टेक्सासमध्ये राहते. दोघांना केंद्रा आणि जोश ही दोन मुले आहेत.

8/8

आता 60 वर्षांची अभिनेत्री

आता मीनाक्षी शेषाद्रीचा लूक खूप बदलला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळे झाले आहे. पण एक काळ असा होता जेव्हा प्रत्येकजण तिच्या नजरेचे, हसण्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे वेडे होते.