APMC Election Results : बाजार समितीचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो? जाणून घ्या...

APMC Election Results : राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहेत. राज्यात एकूण 253 बाजार समित्याअसून त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांपैकी 147 बाजार समित्यांची शुक्रवारी निवडणूक पार पडली असून त्याचे निकाल आता समोर आले आहेत. पण या बाजार समितीचा शेतकऱ्यांना नक्की फायदा काय होतो?

Apr 29, 2023, 19:51 PM IST
1/6

benchmark price

बाजार समितीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची बेंचमार्क प्राईस त्यांना इथूनच कळते. शेतकरी बाजार समित्यांमधील भावाची तुलना करुन आपला माल योग्य बाजार समितीमध्ये नेऊ शकतो.

2/6

Market Committee

व्यापारी त्यांना हवा असलेलाच माल शेतकऱ्यांकडून विकत घेतो. मात्र बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल तीन विभागांमध्ये विभागला जातो. उत्कृष्ट, दोन आणि तीन अशा गटांमध्ये शेतकऱ्याच्या मालाची विभागणी केली जाते.

3/6

maharashtra farmers

काही शेतकरी त्यांचा उत्तम प्रतीचा माल हा व्यापारांना देतात. तर उर्वरित शेतकऱ्यांसाठी बाजार समितीचा पर्याय उपलब्ध असतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाच्या माल शेतकरी बाजार समितीमध्ये आणतात.

4/6

Agricultural goods

आवक वाढली तर व्यापारी त्याला पाहिजे तितकाच माल घेऊन खरेदी बंद करतो. मात्र बाजार समितीमध्ये अतिरिक्त हंगामी आवक होत असल्याने शेतकरी आपला माल तिथे विकू शकतो.

5/6

Fraud of farmers

व्यापाऱ्यांकडून अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे आपण ऐकले असेल. मात्र बाजार समितीमध्ये असे प्रकार करता येत नाही. बाजार समितीमध्ये उशिरा का होईना शेतकऱ्याला पेमेंट मिळतेच.

6/6

farmer Factory

आजकाल काही कारखाने शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी करतात. त्यांनी जर पूर्णपणे माल खरेदी केला तर त्यामध्ये कारखान्यांची एकाधिकारशाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बाजार समित्या शेतकऱ्यांना मोठ्या फायदेशीर ठरतात. बाजार समितीमध्ये निर्यातदार, छोटे व्यापारी यांच्यामध्ये स्पर्धा तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव देखील मिळतो.