Asha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...

Asha Bhosle Birthday : वय वर्ष फक्त 16 असताना प्रेमासाठी त्यांनी घरातून पळून जाऊन 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं. त्यानंतर आयुष्यात त्यांना बरं काही पाहवं लागलं. गरोदर असताना त्यांना घरं सोडवं लागलं. 

Sep 08, 2024, 10:24 AM IST
1/9

आशा ताई म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले यांचा जन्म ब्रिटिश भारतातील सांगलीमध्ये 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. आशा भोसले यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गायला सुरुवात केली. 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये 20 भाषांमध्ये 12000 हून अधिक गाणी गायलेल्या आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाचे आणि अफेअरचे काही रंजक किस्से सांगणार आहोत. 

2/9

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांचे सचिव गणपत राव भोसले यांच्याशी लग्न करण्यासाठी घर सोडलं. गणपत राव भोसले हे आशाताईंपेक्षा 15 वर्ष मोठे होते. या लग्नामुळे लतादीदीही त्यांच्यावर नाराज होत्या आणि त्यांनी अबोला धरला होता. मात्र हे लग्न यशस्वी झालं नाही. 1960 मध्येच त्या या नात्यातून विभक्त झाल्यात. पहिल्या लग्नातून त्यांना फक्त मनस्ताप मिळा. त्यांना सासरी मारहाण सहन करावी लागली होती. 

3/9

दोन मुलं आणि गरोदर असताना त्यांनी सासरं सोडलं आणि आईचं घर गाठलं. संगीताच्या जगात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या आयुष्यात ओ.पी.नय्यर आलेत. खरं तर आशा ताईंना आशा भोसले बनवण्याचे श्रेय हे त्या स्वत: ओ. पी. नय्यर यांना देतात. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना नय्यरसाहेब आणि आशा भोसले खूप जवळ आले होते. 

4/9

नय्यर आणि आशा भोसले यांच्यातील प्रेमसंबंध 1958 ते 1972 पर्यंत कायम राहिलं. चार मुलं असलेला विवाहित पुरुष आणि 3 मुलं असलेली घटस्फोटित महिला, आशा भोसले मुंबईत मोकळेपणाने फिरत होत्या. साहजिकच त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीसाठी या बऱ्याच खळबळजनक गोष्टी होत्या. ओ.पी. नय्यर यांचं आशा भोसले यांच्यासोबतचं प्रेमसंबंध 14 वर्षे टिकलं. 

5/9

एकेकाळी ओपी नय्यर यांच्या कॅडलॅक कारमध्ये फिरणाऱ्या आशा भोसले यांनी 1972 मध्ये आपल्या आयुष्यातील हा संगीतमय अध्याय संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आशा भोसले आणि ओपी नय्यर यांनी कधीही एकाच छताखाली पाऊल ठेवलं नाही. पण त्याआधी त्यांनी 1973 चा चित्रपट पुरस्कार मिळालेल्या 'प्राण जाये पर वचन ना जाए' या चित्रपटासाठी एक गाणे रेकॉर्ड केलं. आशा त्या फंक्शनला गेल्या नाहीत. ओ.पी.नय्यर यांनी त्यांच्या वतीने ट्रॉफी घेतली. घरी परतत असताना त्यांनी चालत्या गाडीतून ट्रॉफी रस्त्यावर फेकली.

6/9

आशा भोसले यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे नायर साहेबांच्या घरच्यांनी त्यांच्यापासून दुरावले आणि एके दिवशी आशा भोसलेही त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्या. नायर साहेबांना आपली चूक कळली तोपर्यंत नुकसान झालं होतं. 1994 मध्ये त्यांनी आपलं घर, बँक खातं, कार, सर्वकाही सोडलं आणि एका अज्ञात कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहू लागले.

7/9

त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आले पंचम दा म्हणजे R D Burman. ते आशाताईंच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली. आशाताईंचंही त्यांच्यावर प्रेम होतं पण त्यांनी लग्नाला नकार दिला. इकडे पंचम दा यांच्या आईलाही हे लग्न मान्य नव्हतं. अशात लतादीदीनी पुढाकार घेतला आणि अनेक वर्ष होकार-नकारचा खेळ सुरु राहिला अन् त्यांनी लग्न केलं. 

8/9

वयाच्या 47 व्या वर्षी आशा भोसले यांनी पंचम दांशी लग्न केलं. पंचम दा यांचंही हे दुसरं लग्न होतं. त्यांचं पहिलं लग्न रिटा पटेलसोबत झालं होतं. तर आरडी बर्मन हे आशा भोसले यांच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होते. वैवाहिक जीवनाच्या 14 वर्षांनंतर पंचम यांनी जगाचा निरोप घेतला. 4 जानेवारी 1994 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 

9/9

आशा भोसले यांना तीन मुलं आहेत. आशा भोसले यांच्या कन्या वर्षा यांनी 8 ऑक्टोबर 2012 मध्ये स्वतःचं जीवन संपवलं. आशा भोसले यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आनंद भोसले झगमगत्या विश्वापासून दूर असतात.