Ashadhi Ekadashi : वारीच्या नाना परी! अबालवृद्धांना लागली विठ्ठलभेटीची आस; पाहा काही Exclusive Photos

Ashadhi Ekadashi  : मोह, मत्सर, क्रोध अशा सर्व भावना पाठीशी ठेवत निर्मळ भावानं पंढरीच्या वाटेवर निघालेले हे वारकरी पाहताना नकळतच आपलंही मन भरून येतं. अशा या वारीतील आतापर्यंतचे काही खास क्षण...   

Jun 14, 2023, 11:24 AM IST

Ashadhi Ekadashi  : विठ्ठलभेटीची आस मनी घेऊन वैष्णवांचा मेळा आता हळुहळू पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकत आहे. संतजनांच्या पालख्या आणि त्याच्यासोबत निघालेल्या दिंड्या निसर्गाच्या अगाध लीला पाहत, प्रसंगी याच निसर्गाचा मारा झेलत आपली वाट सर करत आहेत. 

1/9

नात्यांची वारी

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

पंढरीच्या वारीमध्ये प्रत्येकजण प्रत्येकासाठी माऊली... मग तो लहान बाळ्या असो किंवा वयोवृद्ध आजी- आबा. माऊली म्हटलं की तिथंच नवं नातं जन्माला आलं. (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

2/9

रुपं विठ्ठलभक्तीची

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

वारीमध्ये प्रत्येकजण बेधुंद होऊन विठ्ठलभक्तीची विविध रुपच दाखवत असतो. त्यातलंच हे एक रुप. 

3/9

माऊलींच्या पादुका

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

यंदाच्या वारीला जाता आलं नाही? चिंता करु नका...माऊलींच्या पादुकांचं घरबसल्या दर्शन घ्या. (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

4/9

दर्शन...

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

वारीसाठी तैनात असणाऱ्या पोलीस पथकालाही माऊलींच्या दर्शनाचा मोह आवरेना. (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

5/9

तयारी वारीची

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

वारीचा प्रत्येक दिवस खास असतो. या दिवसासाठी तयार होणाऱ्या या माऊलींनी आतापर्यंत कितींदातरी वारी अनुभवली असेल ना... (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

6/9

आमची वारी...

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

वारी म्हटलं की टाळकरी आलेच. बरं हा टाळकरी तुम्हाला कसा वाटला? (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

7/9

वैष्णवांचा मेळा

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

संत, वैष्णवांचा मेळा पाहताना मन भरून येतंय. वारीतील हे क्षण तुम्हीही अनुभवाच. (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

8/9

प्रत्येक क्षण खास

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

वारीतील प्रत्येक क्षण या वारकऱ्यासाठीही तितकाच नवा असावा. काहीतरी न्हाहाळणाऱ्या या माऊलींकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)

9/9

तल्लिन विठ्ठलभक्त

Ashadhi Ekadashi pandharpur wari journey photos

वारी म्हणजे वेड, वारी म्हणजे बेभान होऊन विठ्ठल भक्तीत एकरुप होणं. हा फोटो हेच सांगतोय. नाही का? (छायाचित्र सौजन्य- विशाल सवने)