लागली से आस! आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार माऊलींची पालखी

Jul 02, 2021, 11:41 AM IST
1/6

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज म्हणजेच शुक्रवारी प्रस्थान होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुस-या वर्षी प्रस्थान सोहळा मर्यादित म्हणजेच 100 वारक-यांच्या उपस्थितीत होत आहे.   

2/6

प्रस्थानानंतर दर्शनासाठी 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. आळंदीत आज माऊलींचा पालखी सोहळा आहे. मात्र या सोहळ्याला कोरोनाचं ग्रहण लागलंय.   

3/6

माऊली पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या १०० वारक-यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झालीय. तर दर्शनासाठी परवानगी दिलेल्या १६४ पैकी २० वारक-यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.   

4/6

माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. यंदा कोरोनामुळे आळंदीत संचारबंदी आहे.  परिणामी इंद्रायणीचा काठ अगदी शांत आहे.   

5/6

दरम्यान, विठुरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु आहे.   

6/6

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक नियम घालून 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. वाखरी ते इसबावी दरम्यान मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली असून प्रत्येक पालखी सोबत 40 वारकऱ्यांना पालख्यांसमवेत सहभागी होता येणार आहे. (छायाचित्र सौजन्य- कैलास पुरी/ फेसबुक दिंडी)