'अशोक चव्हाण दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते'; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदार पदाचा राजीनामाही दिला. अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणात आहेत. त्यावर आता संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

Feb 13, 2024, 11:14 AM IST
1/7

Ashok chavan at BJP

कारगिल युद्धाच्या शहिदांच्या भूखंडांवर अशोक चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला हे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. भाजपने याविरोधात आंदोलन केले होते. आज त्या शहिदांच्या अपमानाचे काय झालं? असा सवाल राऊतांनी केला.

2/7

biggest scam during the UPA era was the adarsh  scam

पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या दृष्टीने युपीए काळात सगळ्यात मोठा घोटाळा हा आदर्श घोटाळा होता. त्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे, जनता तुमच्यावर थुंकत आहे. शहिदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही

3/7

BJP people are the ones attacking Adarsh scam

आदर्श घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे लोक. नरेंद्र मोदींना भविष्यात देशामध्ये तोंड लपवून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्यांनी मोदींनी भाजपमध्ये आणून पवित्र केले हे दुर्दैव आहे.

4/7

Ashok Chavan Leave Congress two years ago

अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा चव्हाण यांनी शिंदे यांच्याबरोबरच भाजपाशी घरोबा करण्याची योजना आखली होती. 

5/7

Ashok chavan BJP

अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी, भाजपात जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना आता मुहुर्त मिळाला असेल, असेही संजय राऊत म्हणाले.

6/7

Uddhav Thackeray and Ashok Chavan

उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. चव्हाण हे हुशार राजकारणी आणि उत्तम प्रशासक आहेत. हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे.

7/7

decision taken by Ashok Chavan is dangerous for Congress

काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि पकड होती. अशोक चव्हाणांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे.