पाकिस्तानविरुद्ध रोहित 56 ऐवजी 78 वर बाद झाला असता तर...; 'ते' गणित थोडक्यात चुकलं!

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषकामधील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शाहीन शाह आफ्रिदी असो किंवा शादाब असो रोहितने सर्वांच्याच गोलंदाजीवर फटके बाजी केली. मात्र रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. पण रोहितने 78 पर्यंत मजल मारली असती तर त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला असता. जाणून घेऊयात याचबद्दल...

| Sep 11, 2023, 11:53 AM IST
1/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आशिया चषक स्पर्धेमधील सुपर-4 च्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माला लय गवसली.

2/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावलं. मात्र रोहित शर्मा सेट झाला आणि मोठा स्कोअर करणार असं वाटत असताना रोहित शर्मा बाद झाला.

3/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

सामन्यातील 17 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संघाची धावसंख्या 121 वर असताना शादाब खानच्या फिरकी गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित बाद झाला.

4/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

रोहित शर्माने 49 चेंडूंमध्ये 56 धावा करुन रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. 

5/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

मात्र रोहित शर्मा 78 धावांवर बाद झाला असता तर त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला असता.

6/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

म्हणजेच रोहितने अजून 22 धावा केल्या असत्या तर तो तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणार सहावा फलंदाज ठरला असता. 

7/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

मात्र रोहित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 56 वर बाद झाल्याने त्याला आणखीन एक सामना वाट पहावी लागणार आहे.

8/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुल, राहुल जद्रविड आणि एम. एस. धोनीचा समावेश आहे. 

9/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

रोहित शर्माने 447 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 468 डावांमध्ये 17 हजार 508 धावा केल्या आहेत.

10/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

रोहित शर्माने एकूण 44 शतकं झळकावली असून 4 द्विशतकं झळकावली आहेत.

11/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

सचिन तेंडुलकरने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजेच 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्याने 1989 ते 2012 दरम्यान 463 सामन्यांमध्ये 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने या धावा केल्या.

12/12

Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score

सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी असून त्याने 2008 पासून आजपर्यंत 278 सामने खेळले असून 57.08 च्या सरासरीने 12904 धावा केल्या आहेत. विराटने या सामन्यात 96 धावा केल्या तर तो 13 हजार धावांचा टप्पा गाठेल.