Chapati Shastra: पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची कुत्र्यासाठीच का? जाणून घ्या या मागचं शास्त्रीय कारण

पोळी बनवताना पहिली पोळी ही गायीला आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी बनवली पाहिजे. ही एक परंपरा आहे जी शतकानुशतके चालत आलेली आहे. पण या मागचं कारण काय हे जाणून घेऊया...

Dec 02, 2022, 15:22 PM IST

Astrology Tips : बऱ्याचवेळा घरातले मोठे आपल्याला सांगतात की पोळी बनवताना पहिली पोळी ही गायीला आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी बनवली पाहिजे. ही एक परंपरा आहे जी शतकानुशतके चालत आलेली आहे. शेवटी, हे करण्यामागे कोणती कारणं आहेत हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की घरातील पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी का बनवली जाते?

1/5

astrology tips why to make first roti for cow and last roti for dog know the reason in detail

हिंदू धर्मात गायीला माता ही म्हटलं जातं. प्राचीन काळापासून गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजाही केली जाते. गायीची पूजा आणि सेवा केल्यानं पुण्य मिळतं. गायीला सर्व देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. अशा स्थितीत गाईला भाकरी खाऊ घातल्यानं सर्व देवी-देवता प्रसन्न होतात. 

2/5

astrology tips why to make first roti for cow and last roti for dog know the reason in detail

सगळ्यात आधी देवी-देवतांना नैवेद्य दिला जातो. त्यामुळे गाईसाठी पहिली पोळी असते आणि असं केल्यानं सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.  

3/5

astrology tips why to make first roti for cow and last roti for dog know the reason in detail

घरात अनेकदा वादाची परिस्थिती निर्माण होते आणि घरातील सदस्यांमध्ये रात्रंदिवस भांडणं होत असतात. कुटुंबात सुख-शांती नसेल तर सकाळी सर्वप्रथम केलेली भाकरी गायीला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घालावी. यामुळे मतभेद आणि भांडणाची समस्या संपते.

4/5

astrology tips why to make first roti for cow and last roti for dog know the reason in detail

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि किंवा राहू-केतू अशुभ असेल तर घरी बनवलेली शेवटची पोळी ही कुत्र्याला खाऊ घालावी. यामुळे सर्व प्रकारच्या दोषांचा प्रभाव कमी होतो.

5/5

astrology tips why to make first roti for cow and last roti for dog know the reason in detail

सकाळी घरी बनवलेल्या पहिल्या पोळीचे चार तुकडे करावेत. पहिला तुकडा गाईसाठी, दुसरा तुकडा कुत्र्यासाठी, तिसरा तुकडा कावळ्यासाठी आणि चौथा तुकडा कोणत्याही चौकात ठेवा. असं केल्यानं पैसे मिळू लागतात आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. (विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)