1 किलो सोनं आणि 7 किलो चांदी.. अयोध्येच्या रामललाचे पादुका, पाहा फोटो

22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत श्रीरामाचे नवनिर्मित मंदिराची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

| Dec 29, 2023, 16:03 PM IST

22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत श्रीरामाचे नवनिर्मित मंदिराची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यानिमित्ताने राम नगरीमध्ये जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापणेनंतर भगवान रामाचे पादुका तेथेच ठेवण्यात येणार आहे. पादुका देशभरात फिरवले जात आहेत. पादुका प्राण प्रतिष्ठा महोत्सवाच्या अगोदर 19 जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचतील

1/7

पादुका दर्शनासाठी उपलब्ध

Ayodhya Ram Mandir Ramlala

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. भगवान रामाच्या पादुका तयार असून एसजी हायवेवरील तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. 

2/7

कसे तयार केले पादुका

Ayodhya Ram Mandir Ramlala

हैदराबादच्या श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी ही पादुका तयार केली आहे. पादुका बनवण्यासाठी 1 किलो सोने आणि 7 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय पादुकामध्ये मौल्यवान रत्नेही बसवण्यात आली आहेत.

3/7

राम लल्लाच्या चरण पादुका

Ayodhya Ram Mandir Ramlala

राम लल्लाच्या चरण पादुका देशभरात नेल्या जात आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी या पादुका 19 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत पोहोचतील. 17 डिसेंबर रोजी त्यांना रामेश्वर धाम येथून अहमदाबाद येथे आणण्यात आले. तिरुपती बालाजीनंतर त्यांना सोमनाथलाही नेण्यात येणार आहे.

4/7

पादुकांसोबत अयोध्येत 41 दिवस प्रदक्षिणा

Ayodhya Ram Mandir Ramlala

श्रीचल्ल श्रीनिवास शास्त्री यांनी या चरण पादुकांसह 41 दिवस अयोध्येची प्रदक्षिणा केली. गेल्या दोन वर्षांपासून या पादुका रामेश्वरम ते बद्रीनाथपर्यंतच्या सर्व प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेल्या जात आहेत.

5/7

रत्नांचा देखील वापर

Ayodhya Ram Mandir Ramlala

या चरण पादुकांमध्ये सोन्या-चांदीशिवाय मौल्यवान रत्नांचाही वापर करण्यात आला आहे. राम मंदिरात रामललाचा अभिषेक झाल्यानंतर प्रभूचे पायही येथे ठेवण्यात येणार आहेत.

6/7

पादुकांना घेतलं डोक्यावर

Ayodhya Ram Mandir Ramlala

बालाजी मंदिराचे विश्वस्त के सुब्बारायुडू यांनी अहमदाबादला पोहोचलेल्या या चरण पादुकांना डोक्यावर घेऊन मंदिरात नेले. यानंतर बालाजी मंदिराच्या पंडितांनी विशेष पूजा केली. काही भाविकांनी या पादुका डोक्यावरही ठेवल्या.

7/7

अयोध्येच्या थिमचा नेकलेस

Ayodhya Ram Mandir Ramlala

गुजरातमधील सुरत येथील एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराच्या थीमवर हार बनवला आहे. विशेष म्हणजे हार बनवण्यासाठी 5 हजार अमेरिकन हिरे आणि दोन किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. हा हार बनवण्यासाठी 35 दिवस लागले आणि 40 कारागिरांनी मिळून तो बनवला. रासेश ज्वेल्सचे संचालक कौशिक काकडिया यांनी सांगितले की, अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरामुळे आम्ही खूप प्रेरित आहोत. 5000 हून अधिक अमेरिकन हिऱ्यांचा वापर करून आम्ही हा नेकलेस तयार केला आहे. ते विक्रीसाठी उपलब्ध नाही. आम्ही ते राम मंदिराला भेट देऊ. आम्हाला राम मंदिरासाठी काहीतरी गिफ्ट द्यायचे होते, म्हणूनच आम्ही हा खास हार बनवला आहे. या हाराच्या धाग्यांवर रामायणातील मुख्य पात्रे कोरलेली आहेत.