Balakot Air Strike : ...जेव्हा भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या, 'ऑपरेशन बंदर'ला 4 वर्ष पूर्ण, पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलाच!

Balakot Air Strike 4 Year Anniversary: पुलवामा दहशतवादी (Pulwama attack) हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन बंदर' ला पूर्णत्वास नेलं. पहाटे 3 वाजता भारतीय वायूसेनेने भारताचा सन्मान पुन्हा मिळवला होता. त्याला आज 4 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Feb 26, 2023, 13:33 PM IST

Balakot Air Strike Anniversary: 26 फेब्रुवारी 2019... भारत साखरझोपेत असताना भारतीय वायूसेना (indian air force) आपलं कर्तव्य बजावत होती. पहाटे 3 च्या सुमारास भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कहर केला. तेही असा तसा नाही, पूर्ण नायनाट... भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज-2000 लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. (balakot air strike 4 year anniversary india air force strike back terrorists in pakistan after pulwama attack)

1/5

लष्कराच्या हवाई हल्ल्यात सुमारे 250 ते 300 दहशतवादी मारले गेले. लष्कराची विमाने सुरक्षित भारतीय सीमेवर पोहोचल्यावर भारताच्या या कारवाईचा सुगावा पाकिस्तानला मिळाला मात्र, भारताची कारवाई इतकी चपळ होती की, पाकड्यांना काहीही करता आलं नाही.

2/5

भारताने 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी (Pulwama attack) हल्ल्याचा बदला घेतला. हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच वाढला होता. भारतानं दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याची माहिती सर्वांना दिली. यामध्ये एकाही नागरिकाला जीव गमवावा लागला नाही.

3/5

14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारतीय विसरू शकणार नाहीत. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या हल्ला केला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) 40 जवान शहीद झाले. त्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील (balakot attack) जैशचे सर्वांत मोठे दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केलं.

4/5

पाकिस्तानमध्ये (Pskistan) घुसायचं आणि हल्ला करायचा, फक्त हल्ला करायचा नाही तर भारतीय भूमीत सुखरूप परत येयचं, अशी संपूर्ण योजना आखण्यात आली होती. संपूर्ण ऑपरेशनला 'ऑपरेशन बंदर' असं (operation Bandar) नाव देण्यात आलं होतं.

5/5

दरम्यान, 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक झाली होती. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी या बैठकीत हवाई हल्ल्याचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं.