जन्माष्टमीनिमित्त सोमवारी बँका बंद राहणार की नाही? तुमच्या शहरात सुट्टी असेल की शाखा उघडतील, जाणून घ्या

Janmashtami Bank Holiday : 25 ऑगस्टला रविवार आणि 26 ऑगस्टला सोमवारी जन्माष्टमीचा उत्साह असणार आहे. अशात बँकांना सुट्टी असणार आहे की नाही, जाणून घ्या. 

Aug 24, 2024, 17:11 PM IST
1/7

जन्माष्टमी, गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी हा हिंदूंचा मोठा सण असतो. सोमवारी (26 ऑगस्ट 2024) अष्टमी तिथीला देशभरात हा सोहळा साजरा करण्यात येतो. 25 ऑगस्टला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. अशात सोमवारी तरी तुमच्या शहरातील बँका सुरु असतील की नाही जाणून घ्या. 

2/7

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सोमवारी, 26 ऑगस्टला जन्माष्टमीनिमित्त देशातील काही भागात बँका बंद राहतील.

3/7

अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

4/7

गुजरात, ओरिसा, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, छत्तीसगड राज्य, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बँकांना शनिवार, रविवार आणि सोमवार सुट्टी आहे. 

5/7

त्रिपुरा, मिझोरम, कर्नाटक, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, केरळ, नागालँड, नवी दिल्ली आणि गोवा राज्यातील बँकांना रविवारची सुट्टी आहे. 

6/7

तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये सोमवारी जन्माष्टमी आणि मंगळवारी 27 ऑगस्ट दहीहंडीची सुट्टी नाही. 

7/7

इंटरनेट बँकिंग, व्हॉट्सॲप बँकिंग, एसएमएस बँकिंग, मोबाइल बँकिंग यासारख्या बहुतांश बँकांद्वारे ऑफर केलेल्या डिजिटल बँकिंग सेवांचा या काळात सुरु असणार आहे.