'हीरामंडी' रिलीज झाल्यानंतर 11 दिवसांनी मोठी घोषणा, आता लवकरच...

Heeramandi 2 Announcement : Netflix ची सुपरहिट वेब सिरीज Heeramandi प्रेक्षकांना खूप पसंत पडतेय. या सिरीजच्या रिलीजनंतर 11 दिवसांनी संजय लीला भन्साळी यांनी मोठी घोषणा केलीय. 

May 13, 2024, 11:31 AM IST
1/7

संजय लीला भन्साळी यांचा 'हीरामंडी: द डायमंड बझार' OTT वर धुमाकूळ घालत आहे. 8 भागांची ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. सध्या OTT च्या जगात हीरामंडी ट्रेंडमध्ये आहे. 

2/7

मुंबई 11 मे रोजी हिरामंडीची सक्सेस पार्टी झाली त्यात संजय लीला भन्साळी अतिशय आनंदी दिसत होते. या पार्टीला या सिरीजमधील सर्व कलाकार उपस्थितीत होते. 

3/7

यावेळी हिरामंडीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. या सिरीजमधील एका अभिनेत्याने पत्रकाराशी बोलताना महत्त्वाची अपडेट दिली आहे.   

4/7

तुम्हाला हिरामंडी आवडला असेल तर आता पुढील सीझनसाठी तयार राहा. कारण हिरामंडी 2 येणार असल्याची पुष्टी अभिनेता इंद्रेश मलिकने एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे. 

5/7

या सिरीजमध्ये इंद्रेश मलिक उस्तादजींची भूमिका साकारली आहे. हिरामंडी 2 ची लवकरच घोषणा होणार असल्याचंही अभिनेत्याने सांगितलं.   

6/7

मात्र हिरामंडी 2 कधी येणार याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. 

7/7

हिरामंडीमध्ये मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सेगल, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ताहा शाह बलोच, रजत कौल, शेखर सुमन, अध्यायन सुमन, फरदीन खान आणि इंद्रेश मलिक झळकले आहेत.