World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; टीममधून बाहेर पडला 'हा' खेळाडू

World Cup 2023 : पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. भारत या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे.

| Sep 25, 2023, 16:10 PM IST
1/5

सद्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून पहिल्या 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. दरम्यान वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

2/5

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल राजकोटमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम वनडे (IND vs AUS 3rd ODI) मधून बाहेर पडला आहे.

3/5

वर्ल्डकपपूर्वी फिटनेस सिद्ध करण्याची अक्षर पटेलला ही शेवटची संधी होती. यानंतर आता 8 ऑक्टोबरला वर्ल्डकपमध्ये टीमचा थेट सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.  

4/5

आशिया कप 2023 दरम्यान अक्षर पटेलला दुखापत झाली होती, ज्यानंतर तो त्या स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळू शकला नव्हता.

5/5

यानंतर अक्षरला दुखापतीतून सावरता आलं नाहीये. याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमधील शेवटच्या सामन्यातून बाहेर पडलाय.