Big Boss 17 मधून बाहेर पडताच विकी जैनला मिळाले विजेत्यापेक्षा जास्त पैसे

सध्या टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 17 फार चर्चेत आहे. आता हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच बिग बॉसचा 17चा विजेता मिळले. मात्र या शो मधून बाहेर पडलेल्या विकी जैनला या शोच्या विजेत्यापेक्षा अधिक पैसे मिळाले आहेत.

Jan 25, 2024, 16:49 PM IST
1/8

big boss winner

'बिग बॉस 17' आता शेवटच्या टप्प्यात आहे. 28 जानेवारीला या शोचा विजेता मिळणार आहे. शोचा फिनाले आता जवळ आला आहे. या शोमधले टॉप 5 देखील मिळाले आहेत. या यादीत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे.

2/8

ankita vicky jain

या शोमध्ये अंकिता लोखंडेसोबत तिचा पती विकी जैनही या शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये विकीने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

3/8

Vicky Jain was out of the big boss show

विकी अंतिम फेरीत आपले स्थान निर्माण करू शकला नाही पण तो संपूर्ण शोमध्ये चर्चेत राहिला. मग ते मुनावर फारुकीशी भांडण असो किंवा अंकितासोबतच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चा असो. फिनालेच्या काही दिवस आधी विकी जैन शोमधून बाहेर पडला होता.

4/8

vicky jain at big boss 17

जेव्हा विकीने शोमध्ये प्रवेश केला तेव्हा लोकांना वाटले की तो अंकिताचा नवरा बनून संपूर्ण गेम खेळेल. पण जसजसे दिवस सरत गेले तसतसे विकी स्वतःचा खेळ खेळू लागला. आता विकी घराबाहेर पडला असून या शोमधून त्याला प्रसिद्धीसोबतच पैसाही मिळाला आहे.

5/8

Vicky Jain for staying on the show for 100 days

पत्नी अंकितासोबत घटस्फोट आणि भांडणाच्या बातम्यांमुळे तो खूप चर्चेत होता. दरम्यान, बिग बॉसने 100 दिवस शोमध्ये राहण्यासाठी विकी जैनला मोठी फी मिळाल्याचे समोर आले आहे.

6/8

Vicky Jain used to charge Rs 71000 for an episode

एका माध्यमांच्या वृत्तानुसार, विकी जैन एका एपिसोडसाठी 71,000 रुपये घेत असे. त्यानुसार तो दर आठवड्याला सुमारे 5 लाख रुपये घेत असे. विकी गेल्या आठवड्यापर्यंत शोमध्ये राहिला. हिशोब केला तर त्याने शो मधून 70 लाख रुपये कमावले आहेत.  

7/8

Ankita Lokhande

त्याचबरोबर अंकिता लोखंडे या शोची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे. वृत्तानुसार अंकिता आठवड्याला जवळपास 12 लाख रुपये घेत आहे.

8/8

big boss final winner

28 जानेवारी रोजी शोचा अंतिम विजेता घोषित केला जाणार आहे. तर या शोच्या विजेत्याला 30 लाख ते 40 लाख रुपयांपर्यंतची बक्षीस रक्कम मिळेल. मात्र, निर्मात्यांनी अद्याप बक्षिसाची रक्कम जाहीर केलेली नाही.