Bigg Boss 14: Rakhi Sawant लवकरच बनणार आई, पतीने केलीय फॅमिली प्लानिंग

बिग बॉसच्या घरातून राखी सावंत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय

Dec 23, 2020, 14:18 PM IST

बिग बॉसच्या घरातून राखी सावंत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय

1/6

राखीच्या लग्नाबद्दल सस्पेन्स कायम

राखीच्या लग्नाबद्दल सस्पेन्स कायम

बिग बॉस १४ मध्ये सहभाग घेणारी राखी सावंत सर्वांचेच लक्ष वेधून घेतेय. आपण एनआरआय व्यावसायिकासोबत लग्न केल्याचा खुलासा तिने काही दिवासांपुर्वी केला होता. पण तिच्या लग्नाचे फोटो कधी समोर आले नाहीत.

2/6

राखी सावंतला आली पतीची आठवण

राखी सावंतला आली पतीची आठवण

मला वाटतं माझ्या पतीने मला भेटायला यावं अशी इच्छा राखी सावंतने व्यक्त केली. त्यामुळे राखीचा पती बिग बॉसच्या घरात एन्ट्री करु शकतो असं म्हटलं जातंय.  

3/6

पतीनं केलं राखीचं कौतूक

पतीनं केलं राखीचं कौतूक

राखीचं वक्तव्य ऐकून पती रितेशनं मीडियाशी संवाद साधला.आपली पत्नी चांगला खेळ करतेय असे त्याने म्हटले.  

4/6

राखीच्या पतीला जायचंय 'बिग बॉस'च्या घरात

राखीच्या पतीला जायचंय 'बिग बॉस'च्या घरात

आपलं नातं राखीने स्वीकारण्यासाठी रितेशला बिग बॉस १४ च्या घरात जायचंय पुढच्या वर्षी ते बाळाला जन्म देण्याबद्दल देखील विचार करतायत. त्यांचं फॅमिली प्लानिंग सुरु झालंय. 

5/6

राखीचा पती करतोय फॅमिली प्लानिंग

राखीचा पती करतोय फॅमिली प्लानिंग

आम्ही पुढच्या वर्षी आई-वडील बनण्याचा विचार करतोय. कोरोना काळामुळे आम्ही यावर्षी भेटलो नाही पण पुढच्या वर्षात आम्ही नात्याच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्याचा विचार करतोय. तिने बिग बॉस १४ ची ट्रॉफी जिंकून घरातून बाहेर यावं. तिच्यात विजेता बनण्याची क्षमता आहे. तिला हा शो जिंकायला हवं असे रितेश म्हणाले.

6/6

निक्कीसोबत झाले होेते राखीचे भांडण

निक्कीसोबत झाले होेते राखीचे भांडण

रितनेशने निक्की तांबोळीच्या  (Nikki Tamboli) वागणुकीवर आपली बाजू मांडलीय. निक्कीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. हा एक गेम आहे ज्यामुळे मी हे गांभीर्याने घेतलं नाहीय. चूक दोन्हीकडून असते. पण निक्कीने खूप वाईट विधान केले. एक महिला असून ती असं कसं बोलू शकते ? असे तो म्हणाला.