Blood Donation Benefits : मानसिक आरोग्यापासून वजन नियंत्रण ठेवण्यापर्यंत रक्तदानाचे अनेक फायदे

World Blood Donor Day 2023 : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. याचा जेवढा फायदा दुसऱ्या व्यक्तीला होतो तेवढ्याच फायदा आपल्या आरोग्यालाही होतो. रक्तदानाचे फायदे जाणून तु्म्ही नक्कीच रक्तदान कराल.   

Jun 14, 2023, 07:31 AM IST

Blood Donation Benefits : रक्तदानाबद्दल कोणाला माहिती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. आपल्यापैकी अनेक जण ठराविक वेळेनंतर नियमित रक्तदान करतात. आपल्या रक्तदानाने कोणाचे तरी प्राण वाचतात. (blood donation day 2023 know 8 benefits of donating blood good for health)

1/10

World Blood Donor Day 2023

रक्तदान केल्या दुसऱ्याला आपण जीनवदान देतो हे जरी खरं आहे तरी रक्तदान केल्याने आपल्या आरोग्याला दुप्पट फायदे होतात. हे फायदे जाणून तुम्हीही अवाक् व्हाल. 

2/10

रक्तदान करणं रक्तदात्यासाठी फायदेशी?

आता तुमच्या मनात प्रश्न येणं साहजिक आहे की रक्तदान करणं रक्तदात्यासाठी फायदेशी आहे? मग World Blood Donor Day 2023 निमित्ताने तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत.  

3/10

लोह काढून टाकण्यास मदत

शरीरातील लोहाचे अतिरिक्त प्रमाण कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे.

4/10

हृदयरोगचा धोका कमी होतो

वर्षातून किमान एकदा रक्तदान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 88 टक्क्यांनी कमी होते. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीने प्रकाशित असा अहवाल दिला आहे. 

5/10

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

रक्तदान केल्यामुळे तुम्हाला आतून आनंद होतो. ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

6/10

यकृत निरोगी राहण्यास मदत

रक्तदान केल्याने शरीरातील अतिरिक्त लोह काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं यकृत निरोगी राहण्यास मदत होते. 

7/10

मोफत आरोग्य तपासणी

रक्तदान करण्यापूर्वी तुमच्या शरीराची तपासणी केली जाते. त्यामुळे निशुल्क आरोग्याची तपासणी होते. पल्स रेट, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि हिमोग्लोबिनची पातळीची माहिती मिळते. 

8/10

वजन नियंत्रणात राहते

रक्तदान केल्याने कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच जर तुम्ही हेल्दी डाएट आणि वर्कआउट केलं तर वजन कायम नियंत्रणात राहतं. 

9/10

लाल पेशींचे उत्पादन

नियमित रक्तदान केल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते. रक्तदानामुळे शरीरात जास्त लाल रक्तपेशी तयार होऊन तुमचं आरोग्य चांगल राहते. 

10/10

कर्करोगाचा धोका कमी

तुम्ही नियमित रक्तदान करत राहिल्यास तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढत नाही . यामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून तुम्ही सुरक्षित राहता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)