close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

Sep 19, 2019, 09:06 AM IST
1/6

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

मुंबई : 'एँड दी आयफा गोज टू....' असं म्हणत बुधवारी सायंकाळपासूनच मुंबईत पार पजलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्य़ात कलाकारांच्या कलेचा गौरव करण्यात आला. यावेळी बऱ्याच बी- टाऊन सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्यामध्ये दिग्गज कलाकारांपासून ते अगदी नव्या जोमाच्या कलाकारांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्याजोगा होता. आलियापासून ते अगदी दीपिका- रणवीर या सेलिब्रिटी जोडीपर्यंत प्रत्येक कलाकाराची वेशभूषाही पाहण्याजोगी होती. (छाया सौजन्य- योगेन शाह) 

2/6

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

फिकट जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दीपिका सुरेख दिसत होती. तर, शाहिदही त्याच्या नेहमीच्याच रुबाबदार अंदाजात सर्वांची मनं जिंकून गेला. (छाया सौजन्य- योगेन शाह) 

3/6

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

पुरस्कार सोहळ्याच्या वेळी रणवीर पुन्हा एकदा आणखी एका लक्षवेधी लूकमध्ये दिसला. राखाडी रंगाच्या कोटसोबत लाल रंगाच्या सॅटीनच्या कापडाची कलात्मक जोड देत त्याने आपला लूक आणखी उठावदार केला होता. याला चार चाँद लावून गेली ती त्याच्या हातातील काठी. (छाया सौजन्य- योगेन शाह) 

4/6

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

पुरस्कार सोहळ्यात 'राझी' या चित्रपटाच्या निमत्ताने छाप पाडणारी अभिनेत्री आलिया भट्ट पीच रंगामधील एका गाऊनमध्ये जणू परीकथेतील एका परीप्रमाणेच दिसत होती. (छाया सौजन्य- योगेन शाह) 

5/6

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

पोपटी आणि गुलाबी रंगाच्या रंगसंगतीतील साडीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या चिरतरुण सौंदर्याचीच जादू आयफाच्या रेड कार्पेटवर पुन्हा पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- आयफा / इन्स्टाग्राम) 

6/6

पाहा आयफासाठी रणवीरचा हटके लूक तर, आलियाचं 'हे' रुप

२०व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित हिचाही अंदाज पाहण्याजोगा होता. या सेलिब्रिटींव्यतिरिक्त इतरही बऱ्याच कलाकार मंडळींचा दिलखेचक अंदाज आयफाच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- आयफा / इन्स्टाग्राम)