अंडरवॉटर रिसॉर्टमध्ये पतीसोबत काजलचा रोमॅन्टिक अंदाज

Nov 13, 2020, 09:26 AM IST
1/7

गौतम किचलू याच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री काजल अग्रवाल हनिमूनसाठी मालदीव बेट या ठिकाणी रवाना झाली. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या काजलनं तिच्या जीवनातील या खास क्षणांचे अनेक फोटोही शेअर केले. 

2/7

समुद्रकिनारी काही खास क्षणांची अनुभूती घेणारी ही अभिनेत्री हनिमूनदरम्यानच एका अंडरवॉटर रिसॉर्टमध्येही गेली. 

3/7

संकल्पना जितकी ऐकायला नवी आहे तितकीच ती पाहायलाही नवी आहे. 

4/7

काजलनं याचीच एक झलक दाखवली आहे. 

5/7

ज्यामध्ये ती निळ्याशार पाण्याखाली असणाऱ्या एका खोलीमध्ये असल्याचं दिसत आहे. 

6/7

हे पाणी इतकं स्वच्छ आणि निळं आहे ती त्यामध्ये असणारे मासेही काचेआड स्पष्टपणे दिसत आहेत. 

7/7

पतीसमवेत खास क्षण व्यतीत करणाऱ्या काजलचे हे फोटो सर्वांचं लक्ष वेधत आहेत. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)