सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पा!

Sep 13, 2018, 17:26 PM IST
1/10

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी बाप्पाला घरी घेऊन आली...  

2/10

संजय दत्त

संजय दत्त

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनंही आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं... यावेळी त्याची मुलगी इकरा दिसली 

3/10

दिग्दर्शक जे पी दत्ता

दिग्दर्शक जे पी दत्ता

तब्बल 12 वर्षानंतर 'पलटन' सिनेमाद्वारे कमबॅक करणाऱ्या दिग्दर्शक जे पी दत्ता यांच्या घरीही गणेशाची स्थापना करण्यात आली... यावेळी त्यांच्या मुलींनी थाटात बाप्पाचं स्वागत केलं

4/10

डेझी शाह

डेझी शाह

'रेस 3' अभिनेत्री डेझी शाह हीनंदेखील आपल्या घरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला लाल रंगाच्या ओढणीनं झाकण्यात आलं होतं

5/10

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन

'सुई धागा'च्या टीमनं आपल्या सिनेमाच्या सेटवरच गणेशाच्या मूर्तीची स्थापना केलीय  

6/10

तुषार कपूर

तुषार कपूर

अभिनेता तुषार कपूरनंही बाप्पाची पूजा केली... आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यानं हा फोटो शेअर केलाय 

7/10

ऋषी कपूर

ऋषी कपूर

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही बाप्पाचं मोठ्या धुमधामीत स्वागत केलं 

8/10

अर्पिता आणि अलवीरा खान

अर्पिता आणि अलवीरा खान

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सलमान खानच्या बहिणींनी आपल्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाची स्थापना केली... गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अर्पिताच्या घरी बाप्पाची स्थापना करण्यात आलीय. 

9/10

सोनू सूद पत्नीसोबत

सोनू सूद पत्नीसोबत

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानंही आपल्या घरी बाप्पाची स्थापना केलीय... फोटोत सोनू पत्नीसोबत पूजा करताना दिसतोय 

10/10

जितेंद्र आणि तुषार कपूर

जितेंद्र आणि तुषार कपूर

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूर यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं...