अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

Jun 04, 2019, 17:37 PM IST
1/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या सुष्मिता सेन हिने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रुपेरी पडद्यावर एखादी भूमिका साकारणं असो किंवा मग आपल्या मुलींविषयी मोठ्या आत्मियतेने माध्यमांसमोर बोलणं असो. अभिनेत्री, मुलगी, आई आणि सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी सौंदर्यवती अशी प्रत्येक भूमिका तिने अगदी प्रभावीपणे पार पाडली. अर्थात प्रत्येक वेळी तिने यात वेगळेपणही जपलं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

सुष्मिताचं खासगी आयुष्यही नेहमीच खास ठरलं आहे. सध्याच्या घडीलासुद्धा ती चर्चेत आहे ते म्हणजे रोमन शॉल या मॉडेलसोबतच्या तिच्या नात्यामुळे. रोमन आणि सुष्मिताने त्यांच्या नात्याची खुलेपणाने कबुली दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रमांमध्येही त्यांची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली होती. याच नात्याची नेमकी सुरुवात कशी झाली, याचा उलगडा तिने राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत केला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

3/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

'त्याने मला इन्स्टाग्रामवर काही मेसेज केले होते', असं म्हणत सुष्मितान रोमन तिच्या आयुष्यात नेमका कसा आला, याविषयी सांगण्यास सुरुवात केली. 'इन्स्टाग्रामवर आलेले मेसेज मी सहसा पाहत नाही. कारण, त्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी संवाद साधण्याची परवानगी देता', असा स्वत:चा विचार तिने मांडला. पण, नेहमी कोणाच्याही मेसेजला रिप्लाय न देणाऱ्या सुष्मिताच्या नशीबात मात्र काही वेगळंच होतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

रोमनसोबत आपण प्रथमत: केव्हा संवाद साधला, याविषयी सांगत सुष्मिता म्हणाली, 'त्याने मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. मला असे असंख्य मेसेज आले होते. मी ते पाहिलं..... आणि.....मी फक्त मेसेजच्या सेक्शनमध्ये गेले होते. तितक्यातच खोलीत काहीतरी तुटल्याचा आवाज मला आला. माझं लक्ष विचलीत झालं आणि चुकून रोमनचा मेसेज माझ्याकडून वाचला गेला. मला त्यावेळी काही कळतच नव्हतं. फोन जवळ असताना मी बोलणं टाळलंच पाहिजे, असं उगाचच मनात बोलले... '. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

रोमनचा तो मेसेज पाहून सुष्मिताने त्याचं प्रोफाईल पाहिलं. त्यावेळी मेसेज लिहिणारी हिच व्यक्ती आहे, याबाबत ती ठाम होती. अखेर तिने त्याच्या मेसेजचं उत्तर दिलं. 'खूप खूप धन्यवाद... तुमचा मेसेज पाहून मला फार आनंद झाला... या जगातील सारा आनंद तुमच्या वाट्याला येवो...., काळजी घ्या ', असं तिने लिहिलं आणि पुन्हा ती तिच्या कामाला लागली. पुढे अमेरिकेला जात असताना तिने पुन्हा मेसेजची यादी पाण्यासाठी डोकावलं तेव्हा पुन्हा त्याच व्यक्तीचा (रोमनचा) मेसेज आला होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

6/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

'तुमचा रिप्लाय पाहून मला इतका आनंद झाला आहे, की मी अक्षरश: एका खोलीतून दुसऱ्या खोलील उड्या मारत आहे. मला यावर विश्वासच बसत नाही आहे.... ' हा त्याचाच मेसेज होता, हा एका अशा व्यक्तीचा मेसेज होता जो दिखाव्यासाठी काहीच करत नव्हता, असं म्हणत सुष्मिताने नेमकं त्या प्रसंगाविषयी सांगितलं. पुढे एक महिन्यासाठी त्यांच्यात कोणताच संपर्क नव्हता. पण, एके दिवशी त्याने तिला फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी बोलावलं. सुष्मिताने त्याऐवजी कॉफीसाठी भेटण्याला पसंती दिली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

7/7

अन् 'त्या' मेसेजपासून झाली सुष्मिता- रोमनच्या नात्याची सुरुवात

अतिशय अनपेक्षितपणे सुरु झालेल्या रोमन आणि सुष्मिताच्या या नात्याला आता नऊ महिने उलटले आहेत. रोमन आपल्याला आयुष्यात कायम आनंदच देतो, असं म्हणत सुष्मिताने तिच्या या खास नात्याची पुन्हा एकदा कबुली दिली. गोष्टी ठरवून करण्यापेक्षा त्या ओघाओघाने होऊ द्या, असा संदेशही तिने या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांनाच दिला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)