कधी सारा, कधी जानव्ही तर कधी न्यासा... Star Kids सोबत दिसणारा तो Mystery Boy कोण?

Bollywood News : बॉलिवूड स्टार्स जितके ग्लॅमरस (Glamorous) आहेत तितकीच त्यांची मुलंही याबाबतीत मागे नाहीत. स्टार किड्स (Star Kids) असल्याने त्यांच्यावर कायमच कॅमेरे रोखलेले असतात. या स्टार किड्सच्या प्रायव्हेट पार्टीचे फोटोही अनेकवेळा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. नविन वर्षाच्या पार्टीत अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) हिच्या ग्लॅमरस फोटोंनी धुमाकूळ घातला होता. याचबरोबर जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या पार्टीचे फोटोही व्हायरल होत असतात. पण या स्टार किड्सबरोबर अनेकवेळा एक मिस्ट्री बॉय ( Mystery Boy) दिसतो.

Jan 03, 2023, 21:32 PM IST
1/5

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि अभिनेत्री काजोलची (Kajol) मुलगी न्यासा देवगणने (Nysa Devgan) दुबईत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन (New Year Celebration) केलं. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत न्यासाबरोबर मॉडेल तानिया श्रॉफ आणि तो मिस्ट्री बॉय दिसत आहे. त्या मिस्ट्री बॉयचं नाव आहे ओरहान उर्फ ओरी अवत्रामाणी (Orhan Awatramani)

2/5

याआधी ओरहान उर्फ ओरी जान्हवी कपूरसोबतही काही पार्ट्यांमध्ये स्पॉट झाला होता. तसंत खुशी कपूरसोबत पार्टी करतानाचे ओरहानचे काही फोटो समोर आले होते

3/5

गेल्या महिन्यातच एका पार्टीत ओरहान सारा अली खानबरोबर एका पार्टीत दिसला होता. सारा आणि ओरहानचे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

4/5

ओरहान उर्फ ओरी हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे, ओरहानला पार्ट्यांचा शौक असून तो अनेकदा मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरहान हा अॅनिमेटर आहे. तसंच टॉप फोर्ड, व्हिजन ऑफ सूपर आणि प्राडा यासारख्या मोठ्या ब्रँडशीही तो जोडला गेला आहे. 

5/5

ओरहान हा स्टार किड्सच्या खास मित्रांपैकी एक आहे, अनेकवेळा तो पार्ट्यांमध्ये स्टार किड्ससोबत दिसतो. आपल्या इन्स्टा हँडलवरही तो स्टार किड्ससोबतचे फोटो शेअर करत असतो. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्यातही ओरहान दिसला होता.