Budh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 7 राशींसाठी अच्छे दिन! 7 जूनपर्यंत घरात येणार पैसाच पैसा

Mercury Transit 2023 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे.  बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, निर्णयक्षमता कारक 7 जूनपर्यंत काही राशींना मालामाल करणार आहे. चांगली नोकरी, आर्थिक फायदासह त्यांचासाठी चांगले दिवस सुरु आहेत. 

Apr 11, 2023, 07:57 AM IST

Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्र आपल्याला येणारा काळ कसा असेल हे सांगतो. ग्रहांच्या गोचरमुळे कोणाच्या नशिबात काय आहे, याची कल्पना देतो. जेव्हा एखादा ग्रह कुठल्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्या राशीसोबत इतर राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. तुमच्या कुंडलीतील कुठल्या घरात कुठली रास आणि ग्रह येतो त्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. सध्या बुध ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु आहेत. (Budh Gochar 2023 Mercury Transit 7 zodiacs promotion progress money till 7 june 2023 astro in marathi news)

1/8

बुध गोचर (Budh Gochar 2023)

बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, व्यवसाय आणि संपत्तीचा कारक मानला जातो. बुध ग्रह हा सध्या मेष राशीत आहे. त्यामुळे 7 राशींना मोठा फायदा होणार आहे. 7 जूनपर्यंत त्यांचासाठी अच्छे दिन असणार आहे. नोकरी, प्रमोशन आणि पैसांनी त्यांचे नशिब उजळणार आहे. 

2/8

मेष (Aries)

बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांना पुढील दोन महिने सुखाचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांची भरभराहट होणार आहे. आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार आहे. नवीन नोकरी, प्रमोशनचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

3/8

मिथुन (Gemini)

बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. समाजात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. व्यावसायत लाभ होण्याची शक्यता आहे. 

4/8

कर्क (Cancer)

बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी असणार आहे. त्यांचे पदोन्नती आणि पगार वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील स्त्रीकडून तुमच्या नशिबात धनलाभ आहे. पुढील दोन महिने तुमचा धार्मिक गोष्टींकडे कल असणार आहे. 

5/8

सिंह (Leo)

बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी पुढील दोन महिने शुभ असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुमच्या संवाद लोकांना प्रभावीत करेल.   

6/8

मकर (Capricorn)

बुध गोचरमुळे या राशीचे नशिब चमकणार आहे. व्यवसाय असो किंवा नोकरी तुम्हाला सगळ्यात फायदा होणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असल्याने तुम्ही एखादी पूजा करु शकता. वडिलोपार्जित मालमत्तेमधून फायदा होणार आहे.   

7/8

कुंभ (Aquarius)

बुध गोचर या राशीसाठी सगळ्याच चांगले असणार आहे. व्यावसायिकांसाठी पुढील दोन महिने लाभदायक आहे. तुमच्या कामात नशिबाची साथ मिळणार आहे. तीर्थयात्रेला जाण्याचे योग तुमच्या नशिबात आहे. पुढील दोन महिन्यात मेहनतीचं फळ मिळणार आहे. 

8/8

मीन (Pisces)

बुध गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी आनंदादायी दिवस असणार आहे. धनलाभ, चांगली नोकरी, समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. व्यावयिकांसाठीही चांगले दिवस असणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.