सुसाट निघा! गेअर बदलण्याचं टेन्शन नाही; परवडणाऱ्या Automatic Cars ची यादी पाहाच

Affordable automatic transmission ATM cars in India: ऑटोमॅटिक कार या आरामदायक ड्रायव्हिंगच्या अनुभवामुळे फार लोकप्रिय आहेत. या कार्समध्ये गेअर बदलण्याचं टेन्शन नसतं. त्यामुळे या कार चालवणं गेअर असलेल्या कार्सच्या तुलनेत अधिक सोप असतं. पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकणाऱ्या लोकांसाठी ऑटोमॅटिक कार चालवणं हे सहज शक्य असतं. तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक कार घेण्याचा विचार करत असाल तर बाजारामध्ये काही खास पर्याय उपलब्ध आहेत. याच पर्यायांबद्दल जाणून घेऊयात...

| Nov 24, 2023, 17:19 PM IST
1/12

Affordable automatic transmission ATM cars in india

या पर्यायांमध्ये सर्वात आधी येते निसान मॅग्नेट. या कारचं टर्बो सीवीटी एक्सवी व्हेरिएंट या प्रकारच्या कार्समधील सर्वात स्वस्त कार आहे.

2/12

Affordable automatic transmission ATM cars in india

निसान मॅग्नेटची टर्बो सीवीटी एक्सवी व्हेरिएंट कार 9.99 लाख रुपयांना (एक्स शो रुम प्राइज) उपलब्ध आहे.

3/12

Affordable automatic transmission ATM cars in india

मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स कारही ऑटोमॅटिक कार्समधील सर्वात स्वस्त पर्याय म्हणून उत्तम आहे. 

4/12

Affordable automatic transmission ATM cars in india

मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स कारचं जेटा टर्बो स्मार्ट हायब्रिट (पेट्रोल) 6-स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्स असलेली ही कार 12.05 लाखांना (एक्स शो रुम प्राइज) उपलब्ध आहे. 

5/12

Affordable automatic transmission ATM cars in india

किआ सॉनेट एसयूव्ही सुद्धा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार्सपैकी एख आहे. या कारचं एचटीएक्स व्हेरिएंट ऑटोमॅटिक गेअर बॉक्ससहीत येतं.

6/12

Affordable automatic transmission ATM cars in india

किआ सॉनेट एसयूव्ही 11 लाख 98 हजारांना (एक्स शो रुम प्राइज) उपलब्ध आहे.

7/12

Affordable automatic transmission ATM cars in india

फ्रेंच कंपनीची निर्मिती असलेली रेनॉल्टची काइगर एसयूव्ही सुद्धा सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार्सपैकी एक आहे. या कारचं 1.0 लीटर पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसहीत उपलब्ध आहे.  

8/12

Affordable automatic transmission ATM cars in india

रेनॉल्ट काइगरचं आरएक्सजेड टर्बो व्हेरिएंट सीव्हीटी गेअरबॉक्ससहीत असून 10.99 लाखांना (एक्स शो रुम प्राइज) ही कार विकत घेता येईल.

9/12

Affordable automatic transmission ATM cars in india

या यादीमध्ये ह्युंडाई व्हेन्यू कारचाही समावेश आहे. या कारचं टर्बो व्हेरिएंट ऑटोमेटिक ट्रांसमिशनसहीत उपलब्ध आहे. 

10/12

Affordable automatic transmission ATM cars in india

ह्युंडाई व्हेन्यूची किंमत 11.43 लाखांपासून (एक्स शो रुम प्राइज)  सुरु होते.

11/12

Affordable automatic transmission ATM cars in india

मारुति सुजुकी ब्रेजा ही कार ऑटोमॅटिक कार्सच्या यादीत अव्वल काही कार्सपैकी एक आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची सुरुवात व्हीएक्सआय व्हेरिएंटपासून होते.

12/12

Affordable automatic transmission ATM cars in india

मारुति सुजुकी ब्रेजाचं व्हीएक्सआय व्हेरिएंट 11.14 लाख रुपयांना (एक्स शो रुम प्राइज) उपलब्ध आहे.