ATM कार्ड नसेल तरी काढता येईल कॅश, कसं शक्य? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

  हिताची लिमिटेडची सहाय्यक कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने यूपीआय एटीएम लॉंच केलंय. याच्या मदतीने तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. 

| Feb 13, 2024, 16:53 PM IST

Cash withdrawal without card:  हिताची लिमिटेडची सहाय्यक कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने यूपीआय एटीएम लॉंच केलंय. याच्या मदतीने तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. 

1/9

एटीएम कार्ड नसेल तरी काढता येईल कॅश, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

Cash withdrawal without card: आपल्याला एटीएममधून पैसे काढायचे असतात पण आपण कार्ड घरीच विसरलेलो असतो. अशावेळी काय करायचं आपल्याला समजत नाही. डेबिट कार्डने एटीएम मशिनमधून पैसै काढण्याची सुविधा आपल्या सर्वांना माहिती आहे. पण आता वाढत्या तंत्रज्ञानामुळे एटीएम कार्ड नसेल तरी तुम्ही पैसे काढू शकता. 

2/9

यूपीआय एटीएमची सुरुवात

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

देशभरात यूपीआय एटीएमची सुरुवात झाली आहे. तुम्ही यूपीआय क्यूआर कोड आपल्या मोबाईलवरुन स्कॅन करुन एटीएममधून पैसै काढू शकता. याची यशस्वी सुरुवात झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे तंत्रज्ञान विकसित केली आहे.

3/9

भारताचे सर्वात पहिले एटीएम

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

भारताचे सर्वात पहिले एटीएम लॉंच झाले आहे. हिताची लिमिटेडची सहाय्यक कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने यूपीआय एटीएम लॉंच केलंय. याच्या मदतीने तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. 

4/9

व्हाइट लेबल एटीएम

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

भारतीयांना ही सुविधा देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने यूपीआय एटीएमचे व्हाइट लेबल एटीएम सेवेत आले आहे. याद्वारे यूपीआय अॅपच्या विविध अकाऊंट्समधून यूजर्सना एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल.

5/9

रुपयांचे पर्याय

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

यूपीआयच्या माध्यमातून तुम्हाला 100, 500, 1000, 2000 ते 5000 रुपये असे पर्याय असतील. इतर रक्कमेसाठी तुम्हाला स्क्रिनवरील बटण दाबावे लागेल. यानंतर यूपीआय क्यूआर कोडचा पर्याय दिसेल. 

6/9

फ्रॉड रोखायला होणार मदत

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

यूपीआय पेमेंट नॉन बॅंकिंग संस्थांकडून चालवले जाणार आहे. यामुळे बॅंकींग इन्फ्रास्ट्रक्चर आणि पैसे काढण्याची लिमिटदेखील वाढणार आहे. तसेच आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे. 

7/9

कोड स्कॅन

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

यूपीआय अ‍ॅपचा वापर करण्याची पूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. तुमच्या यूपीआय अ‍ॅपवरील कोड स्कॅन केल्यानंतर यूजर्स त्यांना हवी ती रक्कम टाकू शकतात. यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे लागेल. आता कॅश काढण्यास सहमती द्यावी लागेल.

8/9

यूपीआय नंबर

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

यानंतर यूपीआय नंबर टाकावा लागेल. यानंतर ट्रान्झाक्शन होत असल्याचा मेसेज तुम्हाला यूपीआयकडून येईल. यानंतर तुम्ही एटीएममधून पैसै काढू शकता.

9/9

ऑपरेटींग सिस्टिम

Cash withdrawal without card via UPI Required For ATM Machine

यूपीआय एटीएम अॅण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिमवर बनवण्यात आलंय. सध्या हिताची पेमेंट सर्व्हिसेस हे एकमेव WLA ऑपरेटर आहे. यांचे 3 हजारहून अधिक एटीएममध्ये नेटवर्क आहे.