'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डेस्टिनेशन वेडिंग लूक

Apr 07, 2019, 09:22 AM IST
1/5

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डेस्टिनेशन वेडिंग लूक

पातळीवर आयोजित केल्या जाणार्या मिस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रसिनिधीत्व करत या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी मानुषी छिल्लर सध्या तिच्या एका नव्या रुपामुळे चर्चेत आली आहे. मानुषीचं हे नवं रुप आहे, एका वधूचं. मानुषीचं हे वधूरुप सोशल मीडियावरही बरच चर्चेत आलं असून, ती खरंच लग्न वगैरे करतेय का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तसं नाही आहे. (छाया सौजन्य- @sabyasachiofficial / इन्स्टाग्राम)

2/5

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डेस्टिनेशन वेडिंग लूक

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याच्या नव्या कलेक्शनसाठी मानुषीचा हा अंदाज पाहायला मिळत आहे. खुदद् सब्यसाचीनेच त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरुन नवं कलेक्शन पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. या कलेक्शनमध्ये काही सुरेख रंगांचा वारप केल्याचं पाहायला मिळत असून, डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे लूक सर्वोत्तम ठरत आहेत.  (छाया सौजन्य- @sabyasachiofficial / इन्स्टाग्राम)

3/5

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डेस्टिनेशन वेडिंग लूक

निळा, हिरवा, सोनेरी, पीच अशा विविध रंगांची रंगसंगती साधत सब्यसाचीने काही अफलातून डिझाईन्स साकारल्या आहेत. त्याच डिझाईन्सना मानुषी तितक्याच सुरेखपणे सर्वांसमोर सादर करताना दिसत आहे. एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठीसुद्धा यानिमित्ताने फोटोशूट करण्यात आलं.  (छाया सौजन्य- @sabyasachiofficial / इन्स्टाग्राम)

4/5

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डेस्टिनेशन वेडिंग लूक

नववधूच्या रुपात मानुषीची अदा आणि तिचं रुप पाहता लग्नाच्या वेळी वधूचा थाट असावा तर असा, हीच भावना प्रत्येकाच्या मनात येत आहे.  (छाया सौजन्य- @sabyasachiofficial / इन्स्टाग्राम)

5/5

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डेस्टिनेशन वेडिंग लूक

मग, यंदाच्या लग्नसराईच्या हंगामात मिस वर्ल्ड मानुषीप्रमाणेच तुम्ही कोणत्या लूकला पसंती देताय?  (छाया सौजन्य- @sabyasachiofficial / इन्स्टाग्राम)