Chanakya Niti: 'या' 4 लोकांच्या खिशात कधीच टिकत नाही पैसा!

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी जगभर ओळखले जातात, चाणक्यांनी पहिल्या मौर्य सम्राट चंद्रगुप्ताला त्याच्या सत्तेच्या उदयात मदत केली आणि मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्याला मोठ्या प्रमाणावर श्रेय दिले जाते.

Jun 03, 2023, 22:36 PM IST
1/5

चाणक्यांनी चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार या दोन्ही सम्राटांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले.

2/5

चाणक्य नीती हा चाणक्याने रचलेला संग्रह आहे. चाणक्य नीति हा प्राचीन भारतीय शिक्षक आणि राजकारण्यांच्या कल्पना आणि विधानांचा संग्रह आहे, यात पैसा कोणाकडे आणि का टिकत नाही याबद्दल देखील सांगितलं आहे

3/5

जो व्यक्ती नेहमी अस्वच्छ असतो, अस्वच्छ कपडे घालतो, त्याच्याकडे पैसा नसतो कारण ते अपवित्र असतात, त्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या अस्वच्छतेमुळे पैसा टिकत नाही

4/5

जे सकाळ-संध्याकाळ झोपतात, आळशी असतात त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही कारण आळशी लोकांकडे लक्ष्मी राहत नाही, अशा व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या आळशीपणामुळे पैसा टिकत नाही

5/5

जे लोक आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात. त्यांचा या सवयीमुळे पैसे त्याच्याकडे टिकत नाहीत, कितीही पैसे कमावले तरी पैसा फार काळ टिकत नाही. त्यांनी आयुष्यात कितीही यश मिळवले तरी पैसा टिकणार नाही. ( Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. )