सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग
Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.
Cheap Gas Cylinder: सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून महागाई कमी करणे हा सर्वांसमोरचा मोठा मुद्दा आहे.एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमती हा राजकीय चर्चेचा विषय आहे. 1 डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नसली तरी लोक आधीच महागाईने हैराण आहेत.