कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तुमची ही चांगली सवय लयभारी

मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus) त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरत आहे. नव्हे ती जिवारच उठत आहे. अनेकांचे जीव या लाटेत जात आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे तुम्ही घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आता घरी असल्यावर कंटाळा येणार. मात्र, कोरोनापासून अधिक सुरक्षित राहायचे असेल तर तुमची ही चांगली सवय तुम्हाला कोरोनाव्हायरसच्या धोक्यापासून 31 टक्के वाचवू शकते, तसा दावा संशोधकांनी केला आहे.

| Apr 24, 2021, 08:18 AM IST
1/5

दररोजच्या व्यायामामुळे कोरोनाचा धोका कमी होईल

दररोजच्या व्यायामामुळे कोरोनाचा धोका कमी होईल

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेने  दररोज हजारो लोकांना घेरले आहे. दरम्यान, मनुष्याच्या चांगल्या सवयीमुळे कोरोनाचा धोका 31 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.  स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार आपण घरी रोज व्यायाम  (Daily Workout) करुन कोरोनाचा धोका हा 31 टक्क्यांपर्यंत कमी करु शकतो.

2/5

संशोधकांनी केला हा दावा

संशोधकांनी केला हा दावा

हा जगातील पहिला मोठा अभ्यास आहे. वर्कआउट्स  (Daily Workout) आणि कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रतिकारशक्ती जोडली गेली आहे. त्यानुसार दररोज व्यायाम केल्याने आपले शरीर चांगले राहते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूंविरुद्ध लढा देण्यास सक्षम होते.

3/5

दररोज व्यायाम करत राहा

दररोज व्यायाम करत राहा

संशोधकांनी दावा केला आहे की, 30  मिनिटे, आठवड्यातून 5 दिवस किंवा 150 मिनिटे व्यायाम केल्याने श्वसनाची समस्या उद्भवत नाही. यात चालणे, धावणे, सायकल चालविणे आणि स्नायूंना बळकटी देण्याचे व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

4/5

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तुमची ही चांगली सवय लयभारी

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तुमची ही चांगली सवय लयभारी

अभ्यासानुसार, जर एखादी व्यक्ती दररोज व्यायाम करत असेल तर त्याला कोरोना लस दिली गेली तर ती 40 टक्के अधिक प्रभावी होते. असे झाल्यास, रोगाचा धोका 31 टक्के आणि मृत्यूच्या जोखमीत 37 टक्क्यांनी कमी केला जाऊ शकते.

5/5

संसर्गजन्य रोगापासून संरक्षण

संसर्गजन्य रोगापासून संरक्षण

ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापाठाचे प्रोफेसर सेबॅस्टियन चॅस्टिन म्हणाले, 'आमच्या संशोधनात असे सूचित केले आहे की नियमित शारीरिक क्रिया संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते. यामुळेच आम्ही लोकांना लसी देण्यापूर्वी 12 आठवड्यांचा फिजिकल अ‍ॅक्टिविटी करण्याचा सल्ला देत आहोत. '