कुर्ल्यातील कसाईवाडा सील

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचा वाढता आकडा मोठी चिंतेची बाब ठरत आहे. 

May 16, 2020, 19:24 PM IST

मुंबईत आतापर्यंत 17 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 655 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

1/7

कुर्ला पूर्व येथील कसाईवाडा पूर्णत: सील करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)  

2/7

कसाईवाड्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाही लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने अखेर पालिकेकडून हा भाग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)

3/7

कसाईवाड्यात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)

4/7

तर या भागात आतापर्यंत ७०हून अधिक कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)

5/7

लॉकडाऊन असतानाही लोक बाहेर फिरत असल्याने, मुंबई महापालिकेच्या एल विभागाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)  

6/7

कसाईवाड्यात जाण्या-येण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)

7/7

रविवारपासून या भागात प्रत्येक घरी जावून लोकांचं स्क्रिनिंग केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य : कृष्णात पाटील)