Lockdown : दिल्लीमध्ये मेट्रो रूळावर धावण्याच्या तयारीत...

प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण   

May 16, 2020, 15:16 PM IST

देशभरातील १५ शहरांमध्ये ट्रेन सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राजधानी दिल्लीच्या १५ शहरांमध्ये अप आणि डाउन मार्गावर रेल्वे धावत आहे. याठिकाणी ११ मे पासूनच आरक्षणाला सुरुवात झाली. प्रवासी गाड्यानंतर आता दिल्लीत मेट्रो रूळावर धावण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे २२ मार्चपासून मेट्रो बंद होती.

1/5

दिल्लीतील मेट्रो सुरू करण्याची तयारी दिसून आली असली तरी नक्की मेट्रो कधी सुरू होणार याची घोषणा करण्यात आली नसल्याची माहिती दिल्ली मेट्रोचे  कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी दिली आहे.   

2/5

मेट्रो सुरू करण्यात आल्यानंतर नियम मात्र अधिक कडक असतील. मेट्रोस्थानकावर कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थांचे दुकान नसेल.   

3/5

शिवाय फक्त ५० टक्के प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता योणार आहे.  

4/5

प्रवासा दरम्यान प्रत्येकाकडे आरेग्य सेतू ऍप असणं गरजेच असणार आहे. त्याचप्रमाणे तोंडावर  मास्कही  बंधणकारक असणार आहे.  

5/5

 कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.