Solo Trip Destination : सोलो ट्रिपचा प्लॅन करताय? ही आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं
आजकाल सर्विकडेचं सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड आहे. तुम्हीही सोलो ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही देशातील या सुंदर ठिकाणी जाऊ शकता.
1/7
दररोजच्या तणावापासून विश्रांती :
दररोजच्या जीवनातून विश्रांती घेण्यासाठी प्रवास आणि सहलींपेक्षा चांगले अजून काय असू शकते. प्रवास केल्याने तणाव तर दुर होतोच, त्यासोबतच दिनक्रमातून ब्रेकही मिळतो. तुम्हाला नवीन पदार्थ चाखायला आणि नवीन लोकांना भेटायला मिळते. या सर्वांव्यतिरिक्त, ही सहल साहसी आहे जी तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांमध्ये समाविष्ट होईल.
2/7
भारताचं नैसर्गिक सौंदर्य :
भारत आपल्या सभ्यता आणि संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. प्राचीन काळीही पर्यटक भारतात येत असत. अनेक तत्वज्ञानी पर्यटकांची नावे इतिहासात कोरलेली आहेत. अनेक तत्त्ववेत्त्यांनी त्यांच्या पुस्तकात भारतातील सभ्यता आणि संस्कृतीचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्राचीन काळी लोक ज्ञान मिळविण्यासाठी एकटे प्रवास करत असत. आजच्या काळात एकट्याने प्रवास करणे याला सोलो ट्रिप म्हणतात. लोक त्यांच्या सभोवतालच्या सुंदर ठिकाणी एकट्याने ट्रिपसाठी जातात.
3/7
सोलो ट्रिप :
4/7
ऋषिकेश :
हे एकट्या ट्रिपला जाण्यासाठी योग्य ठिकाण आहे. गंगेच्या काठावर वसलेले हे शहर धार्मिक वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. ऋषिकेशमध्ये अनेक आश्रम आहेत. जिथे, तुम्ही एकटे योग आणि ध्यान करू शकता. यातल्या काही आश्रमांमध्ये राहण्याची व भोजन व्यवस्था अगदी मोफत असते. याशिवाय ऋषिकेशमधील नीळकंठ महादेव मंदिर, भारत मंदिर, लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, स्वर्ग आश्रम, वशिष्ठ गुंफा, गीता भवन आदी ठिकाणांनाही गंगा आरतीसह भेट देता येते.
5/7
धर्मशाळेतील तुशिता :
6/7
जयपूर :
जर तुम्हाला दिल्लीच्या आजूबाजूला एकट्याने फिरायला जायचे असेल तर तुम्ही गुलाबी शहर जयपूरला जाऊ शकता. जयपूर हे आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. जयपूरला भेट देण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषतः, जयपूर हे सोलो ट्रिपसाठी योग्य ठिकाण आहे. कमी बजेटमध्ये जयपूरला भेट देता येते. येथे फिरण्यासाठी तुम्ही हवा महल, गोविंद देवजीचे मंदिर, राम निवास बाग, गुडिया घर, चुलगिरी जैन मंदिर अशा अनेक जागा आहेत
7/7