शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

Apr 11, 2019, 20:35 PM IST
1/6

शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

'सप्तपदी हे रोज चालते तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो माझे नाते....' या ओळी आठवल्या की डोळ्यांसमोर उभा राहतो तो लग्नमंडप आणि अर्थातच लग्नाचा धामधुमीचा माहोल. सध्याच्या घडीला लग्नाच्या या चर्चा होण्याचं निमित्त म्हणजेही लग्नच आहे.

2/6

शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून काही मित्रांची वेगळीच दुनिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'अॅना', 'आशू', 'रेश्मा', 'सुजय', 'कैवल्य' अशी पात्र साकारत अमेय वाघ, पूजा ठोंबरे, सुव्रत जोशी आणि सखी गोखले या तरुण कलाकरांनी ही पात्र साकारत मैत्रीचा एक वेगळाच दर्जा दिला असं म्हणायला हरकत नाही.         View this post on Instagram #SakhigotSued - Act 1.  The one in the mango orchard, by the river, basking in the love of our family! PC- @lets_draw_light @the_humorous_anry A post shared by Sula (@suvratjoshi) on Apr 11, 2019 at 7:13am PDT

3/6

शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मालिमुळे प्रकाशझोतात आलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी हे विवाहबंधनात अडकले आहेत. 

4/6

शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या सुव्रत आणि सखीने अखेर त्यांच्या या नात्याला एक सुरेख असं वळण दिलं आहे. त्यांच्या नात्यातील या आनंदाच्या क्षणी चाहत्यांनीही या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. 

5/6

शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

या दोघांनीही सुरुवातीला हे नातं सर्वांसमोर जाहीर केलं नाही. पण, अखेर त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा आणि सोशल मीडियावरील पोस्ट पाहून 'दिल दोस्ती दुनियादारी'तील ही जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांसाठी तितकीच खास आहे हे स्पष्ट झालं. 

6/6

शतजन्मीचे हो माझे नाते.... सुव्रत- सखीचं शुभमंगल!

गुरुवारी म्हणजेच ११ एप्रिलला सुव्रत आणि सखी एका खासगी समारंभात विवाहबंधनात अडकले. अतिशय खासगी स्वरुपाच्या या कार्यक्रमात त्यांचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार अशा मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून, सुव्रतने आणि सखीनेही या सोहळ्यातील काही फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये मेहंदी सोहळ्याचीही झलक पाहायला मिळाली.