मैत्रिणीची लिपस्टिक वापरताय, गुलाबी ओठांवर होऊ शकतो वाइट परिणाम

 ऑफिस, शाळा किंवा कॉलेजमध्ये अनेकदा आपण मैत्रिणींच्या वस्तू वापरत असतो. मग ते कपडे असो किंवा मेकअपचे प्रोडक्ट. पण मैत्रिणींचे मेकअप प्रॉडक्ट वापरणे योग्य आहे का? जाणून घेऊया. 

| Jun 03, 2023, 19:48 PM IST

 ऑफिस, शाळा किंवा कॉलेजमध्ये अनेकदा आपण मैत्रिणींच्या वस्तू वापरत असतो. मग ते कपडे असो किंवा मेकअपचे प्रोडक्ट. पण मैत्रिणींचे मेकअप प्रॉडक्ट वापरणे योग्य आहे का? जाणून घेऊया. 

1/6

मैत्रिणीची लिपस्टिक वापरताय, गुलाबी ओठांवर होऊ शकतो वाइट परिणाम

 disadvantages of sharing lipstick and lip balm

 दोन मैत्रिणी सतत सोबत असतील तेव्हा ते हमखास एकमेकींच्या वस्तू वापरतात. पण लिपस्टिक, लिपबाम, लिपग्लॉस अशा सेन्सिटिव्ह गोष्टी शेअर करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. मैत्रिणींसोबत लिप बाम शेअर करणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. 

2/6

हिवाळ्यात लिपबामची गरज

disadvantages of sharing lipstick and lip balm

चेहऱ्याबरोबरच ओठांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. ओठ वारंवार कोरडे पडत असतील तर महिला लिपबाम किंवा लिपग्लॉस वापरतात. हिवाळ्यात तर सतत लिपबामची गरज भासते.

3/6

बॅक्टेरिया

disadvantages of sharing lipstick and lip balm

ओठांवर  रक्तवाहिन्या असतात. त्यामुळं तुम्ही ओठांना काहीही लावलं तरी ते रक्ताच्या सहाय्याने शरिरात जाते. शरीरात बॅक्टेरिया पसरण्याचे हेदेखील एक कारण आहे. 

4/6

संसर्ग होण्याची भीती

disadvantages of sharing lipstick and lip balm

तुमच्या मैत्रिणीला जर सर्दी किंवा ताप आला असेल आणि तुम्ही तिने वापरलेले लिपबाम वापरले तर तुम्हालादेखील व्हायरसचा संसर्ग होऊ शकतोय

5/6

ओठ फाटलेले असल्यास

disadvantages of sharing lipstick and lip balm

एखाद्याच्या ओठांवर हार्पिस झाला असेल किंवा तिचे ओठ कापलेले किंवा फाटलेले असतील तर तिने वापरलेली लिपस्टिक वापरु नका. कारण त्याची लागण तुम्हाला होण्याची शक्यता अधिक आहे. 

6/6

मगच लिपस्टिकचा वापर करा

disadvantages of sharing lipstick and lip balm

जर एखाद्या व्यक्तीने तुमची लिपस्टिक वापरली असेल तिच्या वरचा पृष्ठभाग पूर्णपणे पुसल्यानंतरच तिचा वापर करा