उपवासात कांदा, लसूण का खात नाहीत?

हिंदू धर्मात उपवास आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. उपवासासंबंधात धर्मशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. उपवास करताना आहारात काही पदार्थ वर्ज्य असतात. उपवासात कांदा आणि लसूणचं सेवन करत नाहीत. यामागील कारणं तुम्हाला माहितीय का?

Jun 25, 2024, 11:53 AM IST

हिंदू धर्मात उपवास आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. उपवासासंबंधात धर्मशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. उपवास करताना आहारात काही पदार्थ वर्ज्य असतात. उपवासात कांदा आणि लसूणचं सेवन करत नाहीत. यामागील कारणं तुम्हाला माहितीय का?

1/6

 उपवास आणि सणांमध्ये लसूण, कांदा किंवा तामसिक पदार्थ खाण्यास बंदी असते. संकष्टी चतुर्थी असो किंवा एकादशी, प्रदोष व्रतापासून इतर कोणत्याही मोठ्या व्रत आणि सणांमध्ये हे पदार्थ टाळले पाहिजे. पण यामागचे खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? 

2/6

धर्मग्रंथानुसार परंपरेत अन्नाचे तीन भाग केले गेले आहेत. पहिला सात्विक, दुसरा राजसिक आणि तिसरा तामसिक आहार. हे मानवी जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. 

3/6

सात्विक अन्न

सात्विक अन्नामध्ये दूध, तूप, मैदा, हिरव्या भाज्या, फळे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. सात्विक गोष्टींमध्ये सर्वाधिक सत्त्वगुण असतात. त्यामुळे व्यक्तीचे शरीर आणि मन सात्विक राहते. अशा लोकांच्या आयुष्यात नक्कीच जास्त सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. याबाबत एक श्लोकही सांगितला आहे.   

4/6

राजसिक अन्न

आता राजसिक अन्न म्हणजे मीठ, मिरची, मसाले, केशर, अंडी, मासे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. शास्त्रानुसार राजसिक भोजन करणाऱ्यांचे मन खूप चंचल असते. त्यांच्या जीवनात स्थिरता फारच कमी असते.   

5/6

तामसिक अन्न

लसूण आणि कांदा तामसिक आहाराच्या श्रेणीत येतात. असं म्हटलं जातं की तामसिक गोष्टींचे जास्त सेवन केल्याने रक्त प्रवाह वाढतो किंवा कमी होतो. अशा लोकांमध्ये राग, अहंकार, उत्तेजितपणा आणि विलास खूप दिसतात. अशा लोकांना आळशी आणि अज्ञानी देखील मानलं जातं.   

6/6

यामुळेच लोकांना उपवास आणि सण यांसारख्या पवित्र दिवसांमध्ये याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.