कर चुकवण्यासाठी 'हा' पुरावा चुकूनही देऊ नका; सापडलात तर भरावा लागेल 200 पट दंड

कर  चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताना दहा वेळा विचार करा. सापडल्यास मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. 

Jul 24, 2023, 23:16 PM IST

Income Tax : प्रत्येक व्यक्तीला income tax भरावा लागतो. जगभरातील जवळपास सर्वच देशांत ज्या लोकांचं उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना सरकारला टॅक्स म्हणजेच कर द्यावा लागतोच. मात्र, अनेक जण कर चुकवण्यासाठी वेगवेगल्या आयडिया लावतात. घर भाड्याच्या माध्यमातून कर चुकवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याचे खोटे पुरावे जोडल्याचे सिद्ध झाले तर  200 पट दंड  भरावा लागू शकतो.

1/5

इन्कम टॅक्स भरण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख आहे. 

2/5

पुरावे खोटे ठरल्यास 200 पट दंड आकारला जाऊ शकतो. यासाठी आयकर विभागाकडून आर्टीफिशल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. 

3/5

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी नोकरदार खोटी माहिती देऊन रिफंड मिळवतात. ब-याचदा नातेवाईकाच्या घरातच भाड्याने राहत असल्याचं दाखवलं जातं. मात्र असे प्रकार टाळण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला आहे. 

4/5

चुकीमुळे तुम्हाला 200 टक्के दंड भरावा लागेल. 

5/5

कर चुकवण्यासाठी तुम्ही जर खोटे पुरावे जोडले तर तुमची काही खैर नाही.