मासिक पाळीच्या दिवसांत कंबर, पाठदुखीचा त्रास असह्य होतो, करा 'ही' 4 योगासने

मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना क्रॅम्प्स, ब्लॉटिंग, मूड स्विंग्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

| May 31, 2023, 20:14 PM IST

Yoga For Menstrual Cramps: मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना क्रॅम्प्स, ब्लॉटिंग, मूड स्विंग्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

 

1/5

मासिक पाळीच्या दिवसांत कंबर, पाठदुखीचा त्रास असह्य होतो, करा 'ही' 4 योगासने

do these 4 yoga to reduce pain  of period cramps

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यादिवसांत पाच दिवस महिलांना असह्य त्रास होतो. पोटदुखी आणि कंबरदुखीमुळं महिला त्रस्त होतात. तर, काही जणींना हे पाच दिवस इतके कठिण जातात की ते थेट पेनकिलरची गोळी घेतात. पण मासिक पाळीत काही योगासनांचा सराव केल्यास दुखणं कमी होऊन तुमचा मूडही फ्रेश होतो.   

2/5

जानुशीर्षासन

do these 4 yoga to reduce pain  of period cramps

मासिक पाळीच्या काळात जानुशीर्षासन हे आसन केल्यास फायदा होऊ शकतो. हे आसन करताना योगा मॅटवर पाठ ताठ ठेवून सुखासनमध्ये बसा. त्यानंतर दोन्ही पाय लांब करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवावा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या जांघेवर ठेवावी. डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून ठेवा. आता हळूवार शरीराच्या वरच्या भागाला वाकवून डोकं गुडघ्याला लावावं. हातांने पायाचा अंगठा पकडावा. काही वेळ या स्थितीत राहावं. थोडी- थोडी विश्रांती घेत पाच वेळा हे आसन करावं. 

3/5

धनुरासन

do these 4 yoga to reduce pain  of period cramps

धनुरासनमुळं पाठीचा कण लवचिक होण्यास मदत मिळते. हे आसम करताना पोटावर झोपावे व कपाळ जमिनीवर ठेवावे. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा त्यानंत पाय गुडघ्यात दुमडा. डोके वर उचलून हनुवटी जमिनीवर ठेवावी. उजव्या आणि डाव्या हातांनी पायाचे घोटे धरावे. हे आसन करताना हात कोपऱ्यात वाकवू नये. यामध्ये शरिराचा सर्व भार पोटावर येतो. पाच वेळा हे आसन करा.

4/5

उष्ट्रासन

do these 4 yoga to reduce pain  of period cramps

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी वज्रासनमध्ये बसावं. त्यानंतर गुडघे जमिनीवर टेकवावे. तुमचे खांदे आणि गुडघे एका रेषेत असूद्यात. त्यानंतर तुमचे शरीर मागे वाकवा व पायाच्या टाचा धरण्याचा प्रयत्न तरा. नितंब पुढे ढकलून डोके मागे करा. २५ सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पुन्हा मूळ स्थितीत या. पाच वेळा हे आसन करावे. 

5/5

बलासन

 do these 4 yoga to reduce pain  of period cramps

बलासन करताना सर्वात आधी पाठ ताठ ठेवून वज्रासनामध्ये बसा. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात सरळ रेषेत वर उचला. आता कंबरेपासून डोक्यापर्यंतचा भाग जमिनीवर झुकवा. कपाळ जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात सरळ करुन जमिनीवर ठेवा. बलासनाच्या या स्थितीत दोन मिनिटे थांबा.  टीपः योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच योगासनांचा अभ्यास करावा. तसंच इतर काही शारीरिक व्याधी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन या आसनांचा सराव करावा