IPL 2023 : पराभव होऊनही मुंबई इंडियन्सने कमावले 23 हजार कोटी; जाणून घ्या कसे?

Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या शेवटच्या सामन्यात, 'चेन्नई सुपर किंग्स' आयपीएल 2023 चा चॅम्पियन संघ बनला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपदक पटकावले आहे. यासोबत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे.

May 31, 2023, 19:35 PM IST
1/6

rohit sharma

आयपीएल 2023 मधील मुंबईचा प्रवास फायनलपूर्वीच संपला होता. मात्र मुंबईच्या संघाने आठव्या स्थानावरून थेट टॉप 4 पर्यंत मजल मारल्याने त्यांचे कौतुक होत होतं. नीता अंबानी यांच्या मालकीची मुंबई इंडियन्स 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल चॅम्पियन बनली आहे.

2/6

mumbai indians team

मुंबई इंडियन्सआयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा हा संघ आहे. 'मुंबई इंडियन्स' या वर्षी कदाचित आयपीएल चॅम्पियन बनली नसेल पण संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी यावर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे

3/6

Mumbai Indians is 100 percent owned by Nita Ambani and Mukesh Ambani

मुंबई इंडियन्सची 100 टक्के हिस्सेदारी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. अंबानींनी ही टीम 2008 मध्ये 916 कोटी रुपयांना खरेदी केली होती. आज मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. सध्या 'मुंबई इंडियन्स'ची ब्रँड व्हॅल्यू 10,070 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

4/6

mumbai indians brand value

मुकेश अंबानींच्या मालकीचा मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वात फायदेशीर संघ आहे. द ट्रिब्यूनच्या मते, सध्या 'मुंबई इंडियन्स'ची ब्रँड व्हॅल्यू 10,070 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 200 कोटी रुपयांनी वाढली आहे.

5/6

mumbai indians sponsors

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी या आयपीएलच्या प्रत्येक मोसमात अब्जावधींची कमाई करतात. तिकीट विक्री व्यतिरिक्त त्या मीडिया स्पॉन्सरशिप आणि जाहिरातींद्वारे नीता अंबानी पैसा कमावतात. याशिवाय अंबानी कुटुंबासाठी जिओ सिनेमा हा आणखी एक मोठा कमाईचा स्रोत आहे. या हंगामात आयपीएलचे डिजिटल अधिकार जिओ सिनेमाकडे होते.

6/6

Jio Cinema

मुकेश अंबानींच्या Viacom18 ने यावर्षी Jio सिनेमासाठी IPL चे डिजिटल अधिकार 5 वर्षांसाठी 23,758 कोटी रुपयांना विकत घेतले होते. Jio Cinema ने यावर्षी IPL च्या प्रसारणातून 23,000 कोटींची कमाई केली आहे. आयपीएलचे डिजिटल अधिकार पूर्वी डिस्ने + हॉटस्टारकडे होते.