Apple Peels : सफरचंदाची सालं तुम्ही फेकून देताय? आता साठवून ठेवा... यामागे आहे 'हे' खास कारणं

Apple Peels: सफरचंदाची सालं तुम्ही फेकून देताय आजचं ही सवय मोडा कारण तुम्हाला हे असं करणं महागात पडू शकतं. तेव्हा वेळीच ही सवय मोडा आणि जाणून घ्या सफरचंदाच्या सालीचे नक्की फायदे कोणते आहेत. 

Jan 05, 2023, 22:30 PM IST

Apple Peels: सफरचंदाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. सफरचंदाचे अनेक फायदे आहेत. त्याचसोबत आपल्याला आरोग्यासाठीही सफरचंद खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला सफरचंद कधीही खायला आवडतं. रोज एक सफरचंद खाल्ल्यानं तुमच्या सर्व शरिरीक समस्या दूर होतात. परंतु काही लोकांना सफरचंदाची सालं काढून फेकून देण्याची सवय असते. त्यातून आपल्याला त्याचे उपयोगही माहिती नसतात. परंतु थांबा ही साल टाकू नका तर ती आजपासूनच साठवायला सुरूवात करा कारण सफरचंदाच्या सालीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. 

1/5

सफरचंदाच्या सालीचे उपयोग

dont throw apple peels which has useful benefits in your lifestyle find out more

आपल्याला सफरचंद खाण्याचे फायदे माहितीचं आहेत. त्याचबरोबर त्याच्या सालींचेही अनेक फायदे आहेत. तुम्ही सफरचंदाच्या साली फेकत असाल तर असं करून नका उलट ही सालं साठवून ठेवा आणि त्याचा या काही कामांसाठी उपयोग करून घ्या. 

2/5

सफरचंदाच्या साली खा

dont throw apple peels which has useful benefits in your lifestyle find out more

सफरचंदाच्या साली तुम्ही नुसत्याही खाऊ शकता. त्याच लिंबू आणि मीठ घालून तुम्ही ही सालं नुसतीही खाऊ शकता. 

3/5

फेस पॅक

dont throw apple peels which has useful benefits in your lifestyle find out more

तुम्ही सफरचंदाच्या सालीचा उपयोग फेसपॅक म्हणूनही करून घेऊ शकता. या सफरचंदाची सालं मिस्करमध्ये काढून तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता. 

4/5

चिप्स बनवा

dont throw apple peels which has useful benefits in your lifestyle find out more

सफरचंदाच्या सालीचे तुम्ही चिप्सही बनवू शकता. तेव्हा त्याच फक्त तुम्हाला मस्का, मीठ आणि दालचिनी टाकायची आहे आणि ते मस्तपैंकी फ्राय करायचे आहेत. 

5/5

त्वचा हायड्रेड

dont throw apple peels which has useful benefits in your lifestyle find out more

सफरचंदाच्या सालीचा तुमच्या चेहऱ्यासाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपणही या सालींचा उपयोग चेहऱ्यावर ठेवून आपला चेहरा चांगला हायड्रेड करून घेऊ शकतो. 20 मिनिटे तुम्ही ही सालं ठेवल्यावर तुम्हाला याचा चांगला फायदा होईल.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)