close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

डॉ.अमोल कोल्हे विजयानंतर महाराजांचा आर्शीवाद घेण्यासाठी शिवनेरीवर

| May 24, 2019, 19:49 PM IST
1/3

शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घवघवीत यश मिळविल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेतला.

2/3

निवडणूक प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करणार असे अनेक प्रश्न विचारले जात असताना आज विजयानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर डॉक्टर कोल्हेंनी येऊन मोठी घोषणा केली. शिरुर लोकसभा मतदारसंघाची शिवभूमी म्हणून एक वेगळी ओळख असल्याने या शिवभूमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल. असं कोल्हे यांनी म्हटलं.

3/3

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची ते भूमिका साकारत असताना शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा निवडणूक लढवली.