PHOTO: कोण आहे ही 11 वर्षांची मुलगी? अनंत-राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींबरोबर सेल्फी...

South Actor Mahesh Babu Daughter Photo: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. 12 जुलैला मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी यात हजेरी लावली. या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एक लहान मुलगी अनेक सेलिब्रेटिंबरोबर सेल्फी घेताना दिसतेय. 

| Jul 16, 2024, 11:27 AM IST
1/8

कोण आहे ही 11 वर्षांची मुलगी? अनंत-राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींबरोबर सेल्फी...

2/8

अनंत-राधिकाच्या लग्नाचे अेक फोटो आणि व्हिडिओ सोश मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातल्या अनेक फोटोंमध्ये एक अकरा वर्षांची मुलगी बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांबरोबर फोटो काढताना दिसत आहे. एका फोटोत ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या मुलीला गळाभेट करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसतेय. हा फोटो लोकांच्या पसंतीस पडला आहे. 

3/8

दुसऱ्या एका फोटोत ही मुलगी ग्लोबल आयकॉन प्रियंका चोपडा आणि तिचा पती निक जोनसबरोबर पोझ देताना दिसतेय या फोटोत प्रियंकाने पिवळा आऊटफिट तर निकने पिच रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर ही मुलगी फिकट पिवळ्या आऊटफिटमध्ये दिसतेय.

4/8

या फोटोत बॉलिवूड सुपरस्टार रणीवर सिंहबरोबर ही मुलगी मस्ती करताना दिसत आहे. दोघं पाऊट करत फोटो काढताना दिसतायत. या फोटोत रणवीर सिंग बिअर्ड दाढी आणि लांब केसांची पोनी बांधलेला दिसतोय.  

5/8

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबियांची सून ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चनबरोबरही या मुलीने फोटो काढला आहे. या फोटोत अभिनेत्री नम्रता शिरोडकरसुद्धा दिसतेय. फोटोत चौघांच्याही चेहऱ्यावर गोड स्माईल आहे.   

6/8

या मुलीने बॉलिवूडचं बेस्ट कपल्सपैकी एक असलेल्या कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राबरोबरसुद्धा पोझ देत फोटो काढले. या तिघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत कियाराने गुलाबी लेंहगा तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. 

7/8

हॉलिवूडची टॉप अभिनेत्री किम कार्दशियनही अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी झाली होती. या मुलीने किमबरोबरही फोटो काढ सोशल मीडियावर शेअर केला आहे. किम आणि या मुलीने पाऊटसाठी पोझ देत फोटो काढलाय.

8/8

आता तुम्ही विचार करत असाल की मुलगी आहे तरी कोण? दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरची ही मुलगी आहे. तिचं नाव सितारा घट्टामनेनी असं असून ती अकरा वर्षांची आहे. सितारा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. इन्स्टाग्रमावर तिचे 2 मिलिअन फॉलोअर्स आहेत.