Ekta Kapoorने या 19 वर्षांच्या TikTok स्टारला बनवलं थेट अभिनेत्री, तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Social Media Star : सोशल मीडियाने (Social Media) अनेकांना रातोरात स्टार बनवलं आहे. काही जणं तर असेही आहेत की त्यांना थेट बॉलीवूडमध्येही (Bollywood) ब्रेक मिळाला आहे. अशाच काही स्टार्सच्या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. विधी यादव (Vidhi Yadav) असं या स्टारचं नाव असून ती अवघी 19 वर्षांची आहे. इन्स्टा रिलच्या (Insta Reels) माध्यमातून विधी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. आणि आता एकता कपूरने तिला थेट हिरोईन बनवलं आहे. एका बिग बजेट टीव्ही शोमध्ये (TV Show) विधीला प्रमुख अभिनेत्रीची (Actress) भूमिका देण्यात आली आहे.

Mar 24, 2023, 13:35 PM IST
1/6

TikTok Star Vidhi Yadav Now Insta Reel Queen

सोशल मीडियावर टिकटॉकचा जमाना असल्यापासून विधी यादव चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे, आपल्या बोल्ड व्हिडिओजमुळे ती नेहमी चर्चेत असायची. टिकटॉक बंद झाल्यानंतर ती इन्स्टा रीलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडली गेली आहे. 

2/6

Vidhi Yadav Debut In Ekta Kapoor TV Show

विधी सौंदर्यच्याबाबतीतही बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. टीव्ही जगातील प्रसिद्ध प्रोड्यूसर एकता कपूरने विधीचं टॅलेंट ओळखलं आणि तिला आपल्या एका टीव्ही मालिकेत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका दिली.

3/6

Vidhi Yadav TV Serial Molkki

19 वर्षांची विधी एकता कपूरच्या 'मोलक्की' या मालिकेत अभिनेत्रीची भूमिका साकारतेय. या मालिकेतील तिची भूमिका चाहत्यांच्याही चांगलीच पसंतीस उतरली आहे. 

4/6

Vidhi Yadav Crazy Fan Following

सोशल मीडियावर विधीचे लाखो फॉलोअर्स आहे. आता टीव्ही मालिकेमुळे तर फॉलोअर्सच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर विधीचे तब्बल 3 मिलिअन फॉलोअर्स आहेत. 

5/6

Vidhi Yadav Sexy Photo Shoot And Videos

सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असल्याने विधी प्रसिद्धीच्या झोतात आली. पण आता मालिकेत ती एका साध्या मुलीची भूमिका साकारत आहे.

6/6

Vidhi Yadav Trending On Internet

विधी आपल्या चाहत्यांसाठी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळेत. यामुळेच विधी इंटरनेटवर नेहमीच ट्रेंडिंमध्ये असते.