भारतातील ५ सर्वात सुंदर गावं

Nov 21, 2020, 09:42 AM IST
1/5

मावलिनॉन्ग गाव

मावलिनॉन्ग गाव

शिलांगपासून जवळपास 90 किलोमीटर दूर एक छोटंसं गाव मावलिनॉन्ग वसलं आहे. डोंगरांमध्ये हे गाव आहे. येथून वाहणारे झरे दिसतात. आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून त्याची ओळख आहे. पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येतात.

2/5

मिरिक गाव

मिरिक गाव

दार्जीलिंगमधील एक छोटसं गाव आहे मिरिक. नावाप्रमाणेच हे गाव अतिशय सुंदर आहे. समुद्रसपाटीपासून 4905 फूट उंचीवर हे गाव आहे. या गावात एक तलाव आहे. जे मिरिक झील नावाने ओळखलं जातं.

3/5

खोनोमा गाव

खोनोमा गाव

कोहिमापासून 20 किलोमीटर दूर खोनोमा हे गाव हिरव्यागार निसर्गात वसलं आहे. हे गाव आशियामधील सर्वात हिरवंगार गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात जीव-जंतु देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे 250 हून अधि से अधिक झाडांची जाती आढळल्या आहेत.

4/5

स्मित गाव

स्मित गाव

मेघालयची राजधानी शिलांगपासून 11 किलोमीटर दूर एक सुंदर गाव वसलं आहे. ज्याचं नाव आहे स्मित. सुंदर अशा गावांमध्ये हे गाव आहे. या गावावर निसर्गाचं विशेष प्रेम आहे. येथे शेतात भाजी आणि मसाले होतात.

5/5

मलाना गाव

मलाना गाव

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे हिरवं गार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मलाना गाव खूपच सुंदर आहे. येथील निसर्ग खूपच सुंदर आहे. या गावातून मलाना नदी देखील वाहते.